बेस्टने धरली खासगीकरणाची कास, ५०० कंत्राटी कामगार सेवेत

बेस्टने धरली खासगीकरणाची कास, ५०० कंत्राटी कामगार सेवेत

प्रातिनिधिक फोटो

बेस्टच्या खासगीकरणाची कास प्रशासनाने धरली असून प्रथमच कंत्राटी पध्दतीने ५०० कामगारांना सेवेत रुजू क​रण्यात येणार आहेत.यापूर्वी खासगी बसगाड्या, विद्युत विभागात कंत्राटी कामगार नेमले आहेत. त्यामुळे बेस्टची कंत्राटीपध्दतीकडे सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. बेस्ट उपक्रम हा पालिकेचा अंगिकृत उपक्रम असून, गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास बेस्ट उपक्रमाची परिवहन सेवा दिवसेंदिवस तोट्यात जात असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या काही वर्षापासून विद्युत विभाग परिवहन विभागाचा आर्थिक भार सोसत आहे. मात्र विद्युत विभागाच्या शर्यतीत रिलायन्स एनर्जी व टाटा पॉवर आल्याने विद्युत विभागही आर्थिक अडचणीत आला आहे. बेस्टला आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी बेस्ट उपक्रमाने अनेक उपक्रम राबवले. मात्र प्रत्येकवेळी अपयशच आले आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत गेल्याने बेस्ट उपक्रम डबघाईला जाण्याची शक्यता आहे. कामगारांचे महिन्याचे वेतन देण्यासाठीही बेस्टकडे पैसे नाहीत. त्यामुळे  वि​विध ठिकाणी उत्खनन करणे, तारखंड टाकण्याची कामे करणे आणि अन्य संबिधित तांत्रिक कामे पार पाडणे यासाठी अकुशल कामगारांची निवड केली जाणार आहे. यापूर्वी बेस्ट मध्ये नवघाणी या पदावरील कर्मचारी ही कामे कर​तात.
मात्र आता या पदावर कर्मचाऱ्यांची भरती न करता कंत्राटदाराकडून कंत्राटी पद्धतीने पदे भर​ण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. सुमारे ५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सुपर सर्व्हिस पॉईंट व डी एम एंटरप्राइज या दोन​ कंत्राटदारांना कामे दे​ण्यात आली ​असून याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी​ ​बेस्ट समितीत मंजूर झाला. सध्या बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागात ह्याच कामांसाठी नवघाणी कर्मचारी नियुक्त असून त्यांचे वेतन महिन्याला साधारण १९ हजार रुपये आहे. व इतर दिवसाला साधारण १ हजार १४७ रुपये खर्च प्रति कामगार बेस्टला खर्च येतो. तसेच हंगामी कामगारास सध्या बेस्ट उपक्रमाकडून दिवसाला ७०४ रुपये आणि बस पास मिळून ७७४ रुपये खर्च येतो.शिवाय सुरक्षेची साधने व अवजारे देखील या हंगामी कामगारांना पुरवावी लागतात. या १० टक्क्यांचा विचार करता बेस्टला ८५१ रुपये खर्च येतो. त्यामुळे​ मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करण्यासाठी कंत्राटीपद्धतीने ​कामगारांची निवड केली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, कामगारांनी या निवडीला तीव्र विरोध केला आहे.

हा सगळा डाव आहे संपूर्ण बेस्टचा खाजगीकरणाचा. याबाबत आम्ही काल मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतले आहे आणि लक्ष द्यावे अशी विनंती देखील केली आहे. तसेच या काँट्रॅक्ट पद्धतीचा आम्ही विरोध करतो.
-संजय चव्हाण, अध्यक्ष समर्थ कामगार संघटना
First Published on: June 30, 2018 1:54 PM
Exit mobile version