मालमत्ता करबाबतचा उद्याचा बंद स्थगित

मालमत्ता करबाबतचा उद्याचा बंद स्थगित

मालमत्ता करबाबतचा उद्याचा बंद स्थगित

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात जी आय एस मॅपिंग आणि कोलब्रो कंपनीमुळे मालमत्ता करमध्ये करण्यात आलेली वाढ रद्द करावी आणि करवाढीला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी उद्या पुकारलेला बंद एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला आहे. आज महापालिका उपायुक्त संतोष देहरकर यांच्यासोबत सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. जी आय एस मॅपिंग आणि कोलब्रो कंपनीच्या विरोधात बुधवारी उल्हासनगर बंद करण्याची घोषणा काही सामाजिक संघटनांनी केली. या बंदमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राखण्यासाठी मनपा उपायुक्त संतोष देहरकर यांच्या दालनात सहाय्यक पोलीस आयुक्त डी डी टेळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर, नगरसेवक प्रमोद टाले समाजसेवक पंजू बजाज, दिलीप मालवणकर, निखील गोळे, शशिकांत दायमा, ज्योती तायडे, कारी माखिजा आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

उल्हासनगर मनपाने मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी कोलब्रो कंपनीला दिलेला कंत्राट इतर महानगरपालिकेच्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे हा कंत्राट रद्द करण्याचा ठराव गेल्या महासभेत सर्वसंमतीने झालेला आहे. या संदर्भात मी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे, असे असताना देखील कोलब्रो कंपनीचे कर्मचारी दारोदारी जाऊन आपले काम करीत आहेत. त्यांना कामे थांबविण्याचे आदेश द्यावे, असे नगरसेवक प्रमोद टाले यांनी यावेळी सांगितले.

महानगरपालिका आणि कोलब्रो कंपनीच्या करारानुसार कंपनीचे कर्मचारी काम करीत नाहीत, त्यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत. कर संकलनाचे काम करीत असताना त्यांच्यासोबत महापालिकेच्या मालमत्ता विभागातील कर्मचारी सोबत असावेत, असा नियम आहे. मात्र, कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत मनपाचे कर्मचारी नसतात.  पंजू बजाज, समाजसेवक

कोलब्रो कंपनीच्या कामकाजात अडथळा आणणाऱ्या समाजसेवक परमानंद गरेजा यांच्याविरोधात सोमवारी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आकसापोटी दाखल करण्यात आला असून त्यात मुद्दाम गंभीर कलमे लावली आहेत, असा आरोप समाजसेवक दिलीप मालवणकर यांनी केला आहे.

जी आय एस मॅपिंग कोणत्याही परिस्थितीत रद्द होऊ शकत नाही. राहिला प्रश्न कोलब्रो कंपनीच्या कंत्राटाचा तर त्याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. यामुळे सोमवारचा बंद मागे घ्यावा अशी विनंती देहरकर यांनी केली आहे. त्यानुसार सामाजिक संघटनांनी हा बंद एक आठवड्यासाठी स्थगित केलासंतोष देहरकर, उपायुक्त


हेही वाचा – Dongaribuildingcollapse: ‘जे केसरबाईत घडले ते उद्या आमच्यासोबतही घडू शकते’

हेही वाचा – ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर


 

First Published on: July 16, 2019 7:38 PM
Exit mobile version