पं. उमेश मोघे यांची तबला वादन मैफल

पं. उमेश मोघे यांची तबला वादन मैफल

 मेघ मल्हार संगीत विद्यालय यांच्यातर्फे दिल्ली घराण्याचे प्रख्यात तबला वादक पंडीत उमेश मोघे यांच्या स्वतंत्र तबला वादनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विद्यालयाच्या बाल कलाकारांचे कला सादरीकरण व त्यांचा गुणगौरव समारंभही होणार आहे. यासह जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिंहभारती यांचे शुभहस्ते पंडीत उमेश मोघे यांना संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल संगीतातील विशेष पदवी देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

मोघे हे ज्येष्ठ तबला वादक व गुरु पंडीत सुधीर माईणकर यांचे पट्टशिष्य आहेत. पुणे विद्यापीठ व भारती विद्यापीठ येथील संगीत विभागात ते गेली अठरा वर्षांपासून मानद गुरु म्हणून कार्यरत आहेत. जगभरातील अनेक विद्यार्थ्यांना ते विद्या दानाचे अखंडपणे कार्य गेली अनेक वर्षांपासून करत आहेत. संगीत रत्नाकर के ‘ताल तत्व’ आणि ‘देहली का तबला’ ही तबला वादनातील संशोधनामत्क पुस्तके त्यांनी लिहिली आहेत, तसेच सोलो वादनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत.

हा कार्यक्रम सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन (नगरपालिकेशेजारी) येथे २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वा. होणार आहे, तरी संगीतप्रेमी, रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे. प्रवेश सर्वांना विनामुल्य आहे.

First Published on: February 26, 2020 5:39 AM
Exit mobile version