रुग्णांचे स्कॅनिंग करणार्‍या २९ यंत्रांची खरेदी

रुग्णांचे स्कॅनिंग करणार्‍या २९ यंत्रांची खरेदी

C Arm Image Intensifier

रुग्णांच्या आजाराचे निदान व शस्त्रक्रिया करण्यापूर्वी स्कॅनिंग करण्यात येणार्‍या सी आर्म इमेज इंटेन्सशिफायर या यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. तब्ब्ल २९ यंत्र खरेदी केली जात असून केईएम, शीव, नायर, कुपर आणि उपनगरीय हॉस्पिटल्समध्ये या यंत्राचा पुरवठा करून रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या विविध हॉस्पिटल्ससाठी सी आर्म इमेज इंटेन्सशिफायर यंत्राचा पुरवठा, उभारणी, चाचणी तसेच कार्यान्वित करणे यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी २९ यंत्राची खरेदी करण्यात येणार असून याकरता सुमारे ७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ३ वर्षांचा हमी कालावधीनंतर पुढील ५ वर्षे सर्वसामावेशक देखभाल यासाठी कंत्राट कंपनीची निवड करण्यात आहे. सी आर्म इमेज इंटेन्सशिफायर या यंत्राचा वापर रेडिओलॉजीकल स्कॅनिंग करून रुग्णांच्या आजाराचे निदान व शस्त्रक्रिया करण्यासाठी विविध विभागात केला जातो.

या यंत्राच्या पुरवठ्यासाठी तीन कंपन्यांनी सहभाग दर्शवला होता. त्यातील दोन कंपन्या अप्रतिसादात्मक ठरल्या. त्यामुळे प्रोग्नोसिस मेडिकल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव कंपनी पात्र ठरली. या कंपनीकडून या यंत्राची खरेदी केली जात आहे. ही यंत्र येत्या काही महिन्यांमध्ये उपलब्ध होणार आहे.

के.ई.एम. हॉस्पिटल : ०६
लोकमान्य टिळक हॉस्पिटल : ०५
नायर हॉस्पिटल : ०५
कुपर हॉस्पिटल : ०३
प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खातेप्रमुख : १०

First Published on: March 25, 2019 4:51 AM
Exit mobile version