शुद्ध पाण्याच्या मशीन शोभेपुरत्या

शुद्ध पाण्याच्या मशीन शोभेपुरत्या

Pure water machine

केंद्र सरकारने सर्व स्थानकात शुद्ध पाणी पिण्याची योजना अगदी लीटर मागे पाच रुपये अशी अल्प दरात उपलब्ध केली असताना ठाणे येथील या मशीन ऐन उन्हाळ्यात अनेक दिवसांपासून बंद झाल्या आहेत. त्यामुळे तहानलेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. तहान भागविण्यासाठी चारपट पैसे देऊन बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत असून प्रवाशांना नाहक अधिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

सुरुवातीला मोठा गाजावाजा करित रेल्वे प्रशासनाने याची जाहीरात केली होती. शुद्ध पाणी शिवाय शरिराला पोषक आणि कमी किमतीत त्यामुळे रेल्वे प्रवाशांना खूप बरे वाटले होते. मात्र अचानकपणे मागील काही महिन्यापासून एक एक करत सर्वच मशीन बंद झाल्या आहेत. त्याठिकाणी असलेले कर्मचारी देखील गायब झाले आहेत. ठाणे स्टेशनमधून लाखोंच्या संख्येने नागरिक प्रवास करतात. सध्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. उन्हाळ्यात सतत लागणारी तहान भागवण्यासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. त्यातच रेल्वे स्थानकावरील लिंबू पाणी किती हानीकारक आहे हे लोकांना समजल्याने अनेकांनी लिंबू पाणी पिणे बंद केले आहे. मात्र स्टेशनवर देण्यात येणारे शुद्ध पाणी त्याकरिता निर्माण केलेल्या मशीन सध्या बंद असल्याने प्रवाशांना इतरत्र मिळणार्‍या महागड्या बाटलीबंद पाण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही. रेल्वे स्थानकावर असलेल्या अनेक पाणी मशीन बंद अवस्थेत असल्याने प्रवाशांचा गैरसोय होत आहे.

मागील अनेक दिवसांपासून या मशीन आम्ही बंद असलेल्याच पाहत आहोत. संबंधीत अधिकार्‍यांना याविषयी विचारले असता लवकरच सुरू होईल असे उत्तर देतात, मात्र या मशीन्स सुरु होत नसल्याने उन्हाळ्यात फार गैरसोय होत आहे. अशी प्रतिक्रिया महिला प्रवासी वंदना गावडे यांनी दिली.

First Published on: April 12, 2019 4:27 AM
Exit mobile version