‘जीटी’ रूग्णालयात होणार व्यसनमुक्ती चाचण्या!!

‘जीटी’ रूग्णालयात होणार व्यसनमुक्ती चाचण्या!!

फोटो सौजन्य - Justdial

आत्महत्या हा कायमच्या समस्येवरचा तात्पुरता उपाय! नाही का? आजकाल धावपळीच्या जमाण्यात स्वत:कडे पाहायाला वेळच मिळत नाही. ऑफिसचे टेन्शन, कामाचं प्रेशर एक ना अनेक समस्या आजकाल प्रत्येकाच्या मागे हात धुऊन लागलेल्या असतात. त्यातून माणूस व्यसनांच्या आहारी जातोय. मग, हेच व्यसन हाताबाहेर गेल्यानंतर अनेकदा आपण टोकाचं पाऊल उचलतो. मागचा – पुढचा विचार न करता थेट आत्महत्येसारखा सोपा पर्याय निवडतो. पण आता व्यसनमुक्तीसाठी जी.टी म्हणजेच गोकुळदास तेजपाल रुग्णालयात व्यसनमुक्तीसाठी ओपीडी सुरू करण्यात आली आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या रूग्णांना मोफत औषधोपचार आणि अत्याधुनिक चाचण्यांची सुविधा मिळावी म्हणून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पण केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.

व्यसनमुक्ती ओपीडीला केंद्राचं स्वरुप

जी.टी रुग्णालयात असणाऱ्या मानसोपचार विभागांतर्गत हे ओपीडी सुरू करण्यात येणार आली आहे. ७ एप्रिल रोजी या ओपीडीचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे या विभागात भविष्यात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या देखील करणं शक्य होणार आहे. अशी माहिती माहिती जी.टी रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास मैंदाड यांनी ‘माय महानगर’ ला दिली आहे.

आतापर्यंत रुग्णालयात फक्त व्यसनमुक्तीसाठी केंद्र होतं. या केंद्ला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पण, आम्ही केंद्राच्या ग्रांटसाठी अर्ज केला आहे. त्या ग्रांट आल्या की हे सेंटर पूर्णक्षमतेनिशी सुरू करण्यात येईल. तसंच, या सेंटरसाठी लागणारं मनुष्यबळ देखील केंद्र सरकार पुरवणार आहे. आतापर्यंत फक्त एकच सल्लागार जी.टी रुग्णालयात उपलब्ध आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला असून या विभागासाठी मेडिकल ऑफिसर आणि समुपदेशक देखील केंद्र सरकारद्वारे नियुक्त केले जातील. केंद्राकडून पुरवल्या जाणाऱ्या टीममध्ये जवळपास ५ ते ६ जणांचा समावेश असेल. त्यात २ समुपदेशक, २ डॉक्टर्स, फार्मासिस्ट यांचा देखील समावेश असेल. त्यामुळे आता आम्ही ज्या मनुष्यबळात काम करतोय त्यात थोडातरी फरक पडेल. आताची जी ओपीडी आहे त्यात दर दिवशी जवळपास ५० हून अधिक रुग्ण व्यसनमुक्तीसाठी येतात. “
डॉ. सारीका दक्षीकर, मानसोपचारतज्ज्ञ , जी.टी रुग्णालय

First Published on: August 13, 2018 7:21 PM
Exit mobile version