दादरमध्ये दलित पँथरकडून रेल रोको

दादरमध्ये दलित पँथरकडून रेल रोको

पुण्यात ओला-उबरचा गारेगार प्रवास आता महागणार आहे.

ओला, उबर टॅक्सी ड्रायव्हर यांच्या मागणीसाठी दलित पँथरकडून आज दादर येथील पश्चिम मार्गावर रेल रोको करण्यात आला. या रेल रोकोमध्ये २० जणांनी सहभाग घेतला होता. ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत रेल रोको केल्यामुळे रेल्वेचा खोळंबा झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे चाकरमान्यांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. ओला, उबर टॅक्सी ड्रायव्हरने शनिवार मध्यरात्रीपासून संपावर गेले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ओला-उबरचा संप स्थगिक करण्यात आला. परंतु आज पुन्हा एकदा हा वाद चिघळल्याचे दिसून आले आहे.

 

First Published on: November 20, 2018 11:16 AM
Exit mobile version