रविवारी लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक

रविवारी लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ मार्गावर असणार मेगाब्लॉक

संग्रहित छायाचित्र

 

मुंबईः देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वेने रविवारी मेगा ब्लॉक जाहिर केला आहे. ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक बघूनच प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.

कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.मात्र ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि वाशी – पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मुंबईकरांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे.

First Published on: March 24, 2023 10:35 PM
Exit mobile version