रेल्वे-मनपा वादात रेल्वे वसाहतीची दुर्दशा

रेल्वे-मनपा वादात रेल्वे वसाहतीची दुर्दशा

(रेल्वे वसाहत)

वसईतील रेल्वे कर्मचार्‍यांसाठी १४ इमारतीची वसाहत आहे. इथे प्रत्येक इमारतीत चार मजले आहेत. यात २२४ रेल्वे कर्मचार्‍यांचे कुटुंबीय राहतात. वसाहतीत राहणार्‍या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन वर्षांपासून इथे पाणी कनेक्शन नसल्याने रेल्वे कर्मचार्‍यांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. रेल्वेकडून टँकरमधून कॉलनीला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सोबतच दररोज या रेल्वे कर्मचार्‍यांना पिण्याचा पाण्यासाठी बिसलरी बॉटल विकत घ्याव्या लागतात. त्यासाठी रेल्वे कर्मचार्‍यांना महिन्याचे अडीच ते तीन हजार रूपये मोजावे लागत आहेत. रेल्वे प्रशासना हा सर्व प्रकार माहीत असूनसुद्धा आजपर्यत रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची उपाय योजना केल्या जात नाही. वसई रेल्वे कॉलनीमध्ये वसई विरार मनपाकडून पाणी कनेक्शन दिले आहे. पाणी बिलसुद्धा वेळेत भरले जाते. महापालिकेचे सर्व्हिस बिल भरायचे आहे, असे कारण देण्यात आले. त्यावरून मागील ३ महिन्यापासून पाणी कनेक्शन कापण्यात आले.

कॉलनीत मूलभूत सुविधांचा अभाव

कोट्यवधीचे बजेट असलेले रेल्वे प्रशासन स्वतःच्या कर्मचार्‍यांना मूलभूत सुविधा पुरविण्या अकार्यक्षम आहे, असा आरोप रेल्वे कॉलनीतील निवासी रेल्वे कर्मचार्‍यांकडून करण्यात येत आहे. अवाढव्य जागा असूनही मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही. रेल्वे कर्मचर्‍यासाठी कॉलनीची निर्मिती करते वेळी कसल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही.

चोरट्यांची भीती

सुरक्षा भिंती पडल्यामुळे या कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात चोरट्यांचा वावर असतो. नुकतीच इथे दोन घरामध्ये चोरी झाली. या कॉलनीत लोहमार्ग पोलिसांचे ठाणे आहे. मात्र याबद्दल तक्रार केल्यास ते घेत नाहीत. लोकल पोलिसांना द्या, असे सांगण्यात येत आहे.

रेल्वे कर्मचार्‍याचा जीव धोक्यात

या कॉलनी परिसरात गटारांची झाकणे उघडी असल्यामुळे इथे मोठी दुर्घटना होऊ शकते. स्ट्रीट लाइट नसल्यामुळे या गटारात पडण्याची भीती असते. पिण्याची पाण्याची पाईलाइन उघडी आहे. साप आणि इतर जीवजंतू घरात प्रवेश करतात. त्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांच्या जीवला धोका आहे.

वसई रेल्वे कॉलनीमध्ये मनपाकडून पाणी कनेक्शन दिले होते. पाणी बिल वेळेत भरूनसुद्धा महापालिकांचे सर्व्हिस बिल भरण्याचे कारण देण्यात आले. त्यावरून पाण्याची जोडणी कापण्यात आली. यावर आम्ही लवकर उपाययोजना करू आणि इतरही समस्यांवर मार्ग काढू.

– कन्हैया झा, अपर मंडळ रेल्वे व्यवस्थापक (इन्फ्रा), पश्चिम रेल्वे

First Published on: July 14, 2018 4:25 PM
Exit mobile version