उद्या ‘या’ वेळेत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

उद्या ‘या’ वेळेत रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

प्रातिनिधिक फोटो

रविवार २१ ऑक्टोबरला रेल्वेच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गांवर तर पनवेल-वाशी दरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे-कल्याण स्थानंकादरम्यान रविवारी सकाळी १०:३० पासून ते ३:३० पर्यंत मेगाब्लॉक असेल, ज्यामध्ये डाऊन जलद मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत. यामुळे ठाणे-कल्याण स्थानकांमधील वाहतूक डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार असून, लोकल फेऱ्या २० मिनीटे उशीराने धावतील. दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मेगा ब्लॉकच्या काळात प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणाऱ्या जलद आणि सेमीजलद गाड्यांना, नियमीत थांब्याव्यतिरिक्त अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत.


वाचा: पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, आजचा दर काय?

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १०:३५ पासून ते दुपारी २:३५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अप आणि डाऊन वाहतूक धिम्या मार्गावर वळवली जाणार आहे. हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११:३० पासून ते ४:३० वाजेपर्यंत पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. या काळात पनवेल-वाशी दरम्यान एकही लोकल धावणार नाही.


वाचा: एड्स रुग्णांसाठी सुरू होणार मोबाईल व्हॅनची सुविधा

First Published on: October 20, 2018 1:44 PM
Exit mobile version