रेल्वे पुलांच्या गतीमान तपासणीसाठी ‘टॉवर वॅगन’

रेल्वे पुलांच्या गतीमान  तपासणीसाठी ‘टॉवर वॅगन’

टॉवर वैगन

अंधेरीच्या गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्रालय खडबडून जागे झाले आहे. कारण त्या दुर्घटनेनंतर मुंबईकरांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता. त्यामुळेच मुंबई उपनगरातील रेल्वेच्या ४४५ओव्हर पुलांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार १३ जुलै २०१८ पासून पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी आणि वांद्रे ओव्हर ब्रिजची तपासणी सुरू झाली आहे. त्यासाठी रेल्वेकडून अत्याधुनिक टॉवर वॅगन वापरण्यात येत आहे. त्यामुळे हे काम जलद गतीने होत असून रेल्वे कर्मचार्‍यांचा निम्मा वेळ वाचत आहे.

यापूर्वी पारंपरिक पद्धतीने रेल्वे पुलांची तपासणी करण्यात येत असे. त्यासाठी शिडी वापरली जायची. ही शिडी लोअर परळच्या ब्रिज युनिटकडून आणली जायची. शिडीवर एकच व्यक्ती चढू शकत असे. तसेच ही शिडी दोन व्यक्तींनी ओढत न्यावी लागायची. त्यामुळे पुलाच्या तपासासाठी ४ तास लागायचे. टॉवर वॅगनमुळे आता २ तास लागत आहेत.
थेट रेल्वे ट्रॅकवर टॉवर वॅगन उभी करून एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्त इंजिनिअर पुलाचा तपास करू शकतात. आपल्यासोबत अवजारेही सहज घेऊन जाऊ शकतात. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार दरम्यान 110 पादचारी पूल, 29 रेल्वे ओव्हर ब्रिज आणि पाण्याच्या पाईपलाईनचे ४ पूल आहेत.

रेल्वे पूल तपासणीसाठी टॉवर वॅगनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे वेळेची बचत होत आहे. सोबतच पूल तपासणी जलदगतीने होत आहे.
-रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.

First Published on: July 17, 2018 7:30 AM
Exit mobile version