गाडीत रेल्वे प्रवाशांना मिळणार हापूस

गाडीत रेल्वे प्रवाशांना मिळणार हापूस

सध्या आंब्यांचा हंगाम ऐन भरात आहे. कोकणातील हापूस आंबा महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि विदेशातही प्रसिद्ध आहे. देशभरातील हापूसप्रेमी त्याचा स्वाद चाखण्यास उत्सूक असतात. रेल्वे प्रवाशांना हा दर्जेदार हापूस आंब्याचा स्वाद चाखण्यास मिळावा यासाठी आयआरसीटीसीने पुढाकार घेतला आहे. कोकण मार्गावरून धावणार्‍या सर्व गाड्यांमध्ये हा हापूस आंबा मिळणार आहे. त्याची सुरुवातसुद्धा झाली आहे. आयआरसीटीच्या वेबसाइटवर किंवा ‘फूड ऑन ट्रॅप’ या अ‍ॅपच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना हापूस आंब्याची ऑर्डर देता येणार आहे.

धावत्या गाडीत प्रवाशांना पेंट्री कारमध्ये तयार झालेले किंवा बेस किचनमधून आलेले भोजन नेहमीच दिले जाते. मात्र, आता प्रवाशांना रत्नागिरीचे सुप्रसिद्ध हापूस आंबे रेल्वे गाड्यातच इंडियन रेल्वे कॅटिरींग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’ (आयआरसीटीसी) उपलब्ध करून देत आहे. नुकतेच या सेवेच्या शुभारंभ रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून झाला. या सेवेसाठी आयआरसीटीसीने हापूस आंबा वितरण क्षेत्रातील नामांकित रत्नागिरीचे चंद्रा कॅटेरेशी करार केला आहे. प्रवाशांनी ऑर्डर केल्यास आबांच्या पेट्या त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचविण्याची जबाबदारी या चंद्रा कॅटेर्सची असणार आहे. त्यासाठी धावत्या गाडीत प्रवाशांना नोंदणी करावी लागेल व अशी नोंदणी केल्यानंतर साधारणत: रत्नागिरी स्टेशनला गाडी पोहचताच तुमच्या आसनावर कोकणातील सुप्रसिद्ध हापूस आंबे प्रवाशांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. या एक डझन आंबाची किंमत ५४० रुपये ठेवण्यात आली आहे. तर दोन डझन आंब्याची किंमत एक हजार ४० रुपये आहेत. यात कसलाही डिलेव्हरी चार्ज घेतला जात नाही. अत्यंत मुबलक किमत आयआरसीटीसी हे रत्नागिरीचे आंबे रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होत आहेत. रत्नागिरी रेल्वे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटक व केरळकडे धावणार्‍या बहुतेक सर्व रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. त्यामुळे रत्नागिरीचा हापूस आंब्याची चव देशभरात पोहचणार आहे.

अशी करा ऑर्डर ?
या सेवांची सुविधा फक्त रेल्वे प्रवाशांसाठी आहेत. ज्यांचे तिकीट आरक्षित आहे तेच रेल्वे प्रवासी आयआरसीटीच्या www.ecatering.irctc.co.in या वेबसाइटवर आपली ऑर्डर नोंदवू शकतात किंवा ‘फूड ऑन ट्रॅप’ या अ‍ॅपच्या माध्यमातूनही आंब्याची ऑर्डर देऊ शकतात. तसेच १३२३ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधू शकतात. फक्त प्रवाशांना आपला पीएनआर नंबर द्यावा लागले. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती आयआरसीटीसीशी करार झालेल्या वेंडरला देईल. प्रवाशांना आंबे ताजे मिळण्याची हमी आयआरसीटीसीने दिली आहेत.

कोकणातील शान असलेलेला हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. या आंब्याची चव देशभरात पोहचावी यासाठी आयआरसीटीसी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे रेल्वेच्या आरक्षित प्रवाशांना हापूस आंबा मिळावा यासाठी आम्ही ही सेवा सुरु केली आहे. याला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
– नरेंद्र पिपिल, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी

.

First Published on: May 15, 2019 4:51 AM
Exit mobile version