रेल्वे पोलिसांचा जीव मुठीत; इमारत केव्हाही कोसळेल!

रेल्वे पोलिसांचा जीव मुठीत; इमारत केव्हाही कोसळेल!

घाटकोपर मधील जी.आर.पी.एफ. कॉलनी

मुंबईत मागच्या काही दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे घाटकोपरमधील रेल्वे पोलीस मुख्यालयाची बिल्डिंग क्रमांक १ ची संरक्षण भिंत पडल्यानंतर झोपी गेल्या रेल्वे पोलिसांना जाग आली आहे. कारण मागील कित्येक दिवसापासून रेल्वे पोलीस मुख्यालयाच्या बिल्डिंग जीर्ण अवस्थेत आहेत. पोलिसांना तेथून हलविण्याच्या आले नाही. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. आता हालचाल सुरू झाली आहे. घाटकोपरच्या रेल्वे मुख्यालयात एकूण २४ बिल्डिंग आहेत. त्यापैकी ३ बिल्डिंगचे आयुर्मान पूर्ण झाले. यात एकूण ८० पोलीस कर्मचार्‍यांची कुटुंबे राहतात. त्यापैकी ३५ ते ४० पोलिसांच्या कुटुंबीयांना दुसर्‍या इमारती हलविण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. सोबतच त्यांना काही दिवसांसाठी स्वतःची व्यवस्था करण्याचे निर्देशसुद्धा रेल्वे पोलीस प्रशासनाने दिले आहे. मात्र पुरेशी व्यवस्था नसल्याने बाकीच्या पोलिसांची कुटुंबे तिथेच राहत आहेत.

२४ इमारती पैकी १५ इमारती जीर्ण

अगोदरच काही रेल्वे पोलीस कर्मचार्‍यांना सरकारी निवासस्थाने नाहीत. त्यांंना मिळत असलेल्या पगारात त्यांना भाड्याची महागडी घरे घेणे परवडत नाही.त्यामुळे डोक्यावर टांगता धोका घेऊन त्यांना दिवस ढकला लागत आहेत. या रेल्वे पोलिसांच्या २४ इमारती पैकी १५ इमारती जीर्ण झालेल्या आहेत.

पोलिसांना रात्रभर झोप येत नाही….

या बिल्डिंगमध्ये राहणार्‍या रेल्वे पोलिसांच्या कुटूंबियांना रात्रभर झोप येत नाही. सदैव त्यांना बिल्डिंग पडण्याची भीती वाटते. एका पोलिसाच्या पत्नीने सांगितले की, जरासा आवाज झाला तरी भीती वाटते. मुले झोपेतून दचकून उठतात. आम्हाला पूर्ण झोप घेता येत नाही.

वरिष्ठ अधिकार्‍यांचा बोलण्यास नकार….

घाटकोपरमधील रेल्वे पोलिसांच्या जीर्ण झालेल्या सदनिकांविषयी डीसीपी समाधान पवारशी संपर्क केला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.

पोलिसांच्या कुटुंबाला नोटीस पे नोटीस…

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या तिन्ही बिल्डिंगना नोटीस देऊन कित्येक दिवस झाले. तरी कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. तिन्ही बिल्डिंग खचत आहेत. त्या खाली करण्यासाठी रेल्वे पोलीस प्रशासनाकडून पोलिसांच्या कुटूंबियांना सतत नोटिसा देण्यात येत आहेत.

First Published on: July 13, 2018 11:32 AM
Exit mobile version