पावसामुळे रात्रभर अडकलेल्या रेल्वे मुंबईकरांची अखेर घरवापसी!

पावसामुळे रात्रभर अडकलेल्या रेल्वे मुंबईकरांची अखेर घरवापसी!

मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेलं मुंबईकरांचे जीवन पूर्वपदापवर येत आहे. ४८ तासांहून अधिक पावसाची सतंतधार सुरू असल्याने मुंबईची लाईफलाईन असणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. मध्य, हार्बर आणि पश्मिच रेल्वे मार्गांवर याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता तब्बल १२ ते १४ तासांनंतर रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर येत आहे.

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पुर्वपदावर आली असून १५ ते २० तर हार्बर रेल्वेची वाहतूक ३० ते ४० मिनिटे उशिराने सुरू आहे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसटीएस ते ठाणे रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली असून हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसटीएस ते पनवेल ही वाहतूक देखील सुरळीत असल्याची माहिती मध्य रेल्वेने ट्विट करून दिली आहे.

मात्र मध्यरात्रीनंतर उसंत घेतलेल्या पावसाने मुंबईतील लाईफलाईन सुरळीत झाली असली तरी मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे बऱ्याच मुंबईकरांनी तसेच कर्मचाऱ्यांनी घराबाहेर न पडता घरी राहणंच पसंत केले आहे.

First Published on: September 5, 2019 7:25 AM
Exit mobile version