हा तर सत्तेचा माज; महाजनांच्या सेल्फीवर राज ठाकरेंची टीका

हा तर सत्तेचा माज; महाजनांच्या सेल्फीवर राज ठाकरेंची टीका

गिरीश महाजन यांच्या सेल्फी व्हिडिओवर राज ठाकरेंची टीका

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगली येथे पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना सेल्फी व्हिडिओ काढत असंवेदनशीलता दाखवली. त्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर यायला तयार नाही. सत्तेचा माज असल्यामुळेच गिरीश महाजन हे सेल्फी व्हिडिओ काढत आहेत. कारण या लोकांना काही फरक पडत नाही या गोष्टीचा. कसेही वागले तरी मतदान आपल्यालाच पडणार, असा विश्वास सत्ताधाऱ्यांना आहे. याच गोष्टीविरोधात माझा लढा सुरु आहे.”

राज ठाकरे पुढे म्हणाले की, “या लोकांना सत्तेचा माज इतका आलाय की वर्तमान पत्रात आणि चॅनेलवर यांच्या विरोधात बातम्या आल्या तरी आपणच निवडून येणार. आपण जो आकडा सांगितलाय तो येणारच, असा ठाम विश्वास त्यांना आहे. त्यातूनच अशा गोष्टी घडत आहेत.”

राज ठाकरे यांचे लाईव्ह भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा –

 

 

बघा, गिरीश महाजन यांचा सेल्फी व्हिडिओ –

 

First Published on: August 9, 2019 12:26 PM
Exit mobile version