राज ठाकरेंची उद्या चौकशी होणार नाही

राज ठाकरेंची उद्या चौकशी होणार नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ईडी कार्यालयात हजर राहिले होते. गेल्या साडे आठ तास ईडीकडून चौकशी सुरु होती. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत ईडी कार्यालयात आले होते. राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली आणि मुलगी उर्वशी हे संपूर्ण ठाकरे कुटुंबिय या कठिण प्रसंगी राज यांच्या सोबत उपस्थिती होते. दरम्यान, गेल्या साडे आठ तासानंतर आता ते बाहेर आले आहेत. तसेच त्यांची उद्या ईडीकडून चौकशी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, गरज पडल्यास पुढे त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, राज ठाकरे आपल्या कुटुंबासह कृष्णकुंजावर दाखल झाले आहेत.
A view of the sea
Pradnya Ghogale

राज ठाकरेंची उद्या चौकशी होणार नाही

Pradnya Ghogale

राज ठाकरेंची ईडीकडून उद्या चौकशी होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, पुढे गरज पडल्यास त्यांना बोलवण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

Pradnya Ghogale

राज ठाकरेंची ईडी चौकशी संपली असून राज ठाकरे आता ईडी कार्यालयाबाहेर आले आहेत. साडे आठ तासांनंतर त्यांची चौकशी संपली असून ते आपल्या कुटुंबासोबत कृष्णकुंजकडे रवाना झाले आहेत.

Pradnya Ghogale

राज यांची एका दिवशी चौकशी पूर्ण होणार असल्याने उशीर होत असल्याचे बोले जात आहे.

Pradnya Ghogale

गेले साडे आठ तासांपासून राज ठाकरेंची चौकशी सुरू

First Published on: August 22, 2019 10:28 AM
Exit mobile version