राज ठाकरे यांनी घेतली लता मंगेशकर यांची भेट

राज ठाकरे यांनी घेतली लता मंगेशकर यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, शुक्रवार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लिलावती हॉस्पिटलमध्ये भेट घेतली असून त्यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याचे ठाकरे यांनी भेटीनंतर सांगितले. लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या तब्येत लक्षणिय सुधारणा झाली असून लवकरच त्यांना घरी सोडले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबियांनी दिली होती. तसेच वयोमानामुळे लतादीदींना त्रास झाला असून त्या लवकर बऱ्या होतील, अशी आशा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने सोमवारी, पहाटे मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ब्रीच कँडी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉ. फारोख ई उदवडिया (Dr. Farokh E Udwadia) यांच्या मार्गदर्शनाखाली लता मांगेशकर (वय ९०) यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सामान्य चाहत्यांपासून बॉलीवूडकरांपर्यंत सर्वांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीसुद्धा लता दीदींना पत्रं लिहिलं आहे. ‘तुमच्या प्रकृतीविषयी कळताच मला काळजी वाटली. मी आशा करतो की, तुमची प्रकृती लवकरच पूर्वपदावर येईल’, असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.

First Published on: November 15, 2019 2:30 PM
Exit mobile version