मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारर यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुंबईतला शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी राज ठाकरे दाखल झाले आहेत. राज ठाकरे आणि पवारांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही वेळापूर्वीच भाजप आमदार अनिल गोटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

राज ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हटवण्याचा प्रचार करा असे आदेश दिल्यानंतर आज ते शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या सतत होणाऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

First Published on: March 20, 2019 12:16 PM
Exit mobile version