२० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

२० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आयपीएस

राज्यातील २० आयपीएस अधिकार्‍यांना पदोन्नती देऊन त्यांच्या विविध ठिकाणी बदलीचे आदेश गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत. पुण्याचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना पदोन्नती देण्यात आली असून त्यांची मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच अप्पर पोलीस आयुक्त (संरक्षण सुरक्षा, मुंबई) यांची पुण्याच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परीक्षेत्र ) नवल बजाज यांची मुंबई पोलीस दलात सहपोलीस आयुक्त (प्रशासन) म्हणून बदली करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुका संपताच राज्यातील आयपीएस तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बढत्या आणि बदल्याचे वारे वाहू लागले असून मागील १५ दिवसांपूर्वी अनेक आयपीएस अधिकार्‍यांना पदोन्नती देऊन महत्वाच्या ठिकाणी त्याच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या. यामध्ये मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्रात बदली करण्यात आली होती. कौशिक यांच्या बदलीमुळे १५ दिवसांपासून रिक्त असलेल्या मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तपदी रवींद्र सेनगावकर यांना पदोन्नती देऊन त्यांची मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.अप्पर पोलीस आयुक्त (संरक्षण सुरक्षा, मुंबई) यांची पुण्याच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली असून पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांना बढती देऊन त्याच्या अमरावती परिक्षेत्र येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना मुंबई ) राजकुमार व्हटकर यांची नवी मुंबई अपर पोलीस आयुक्त या ठिकाणी बदली कऱण्यात आली आहे. मुंबई पोलीस वाहतूक विभागाची धुरा सहपोलीस आयुक्त म्हणून मधुकर पांडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त (नवीमुंबई) सुरेश मेखला यांची ठाणे पोलीस विभाग येथे बदली कऱण्यात आली असून उत्तर प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्त राजेश प्रधान यांना पदोन्नती देण्यात आली असून त्याची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थपना) कऱण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त परिमंडळ ८ एस.डी.कुंभारे अप्पर पोलीस आयुक्त ठाणे शहर, परिमंडळ २ ज्ञानेश्वर चव्हाण यांची अपर पोलीस आयुक्त (सुरक्षा व संरक्षण, मुंबई) गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत पदोन्नतीवर उत्तर प्रादेशिक विभाग अप्पर पोलीस आयुक्तपदी, सोलापूर शहर पोलीस उपायुक्त एस.एच महावरकर अपर पोलीस आयुक्त नागपूर शहर, पोलीस उपायुक्त एस.डी येनपुरे पदोन्नतीवर ठाणे शहर, मुंबई परिमंडळ १०चे पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपमहानिरीक्षक (राज्य राखीव पोलीस दल) पोलीस उपायुक्त रामनाथ पोफळे यांची पिंपरी चिंचवड येथे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली, अपर पोलीस आयुक्त ठाणे शहर सत्यनारायण चौधरी यांना पोलीस उपमहानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. गडचिरोली (नागपूर कॅम्प) पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. अमरावती परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांची पुण्याच्या अपर पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

First Published on: May 25, 2019 5:30 AM
Exit mobile version