राज्यात होणार १० हजार शिक्षकांची भरती

राज्यात होणार १० हजार शिक्षकांची भरती

पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध

शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात गुरूवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पवित्र वेब पोर्टलवर जाहीर करण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. संपूर्ण महाराष्ट्रात १० हजार शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचार विरहीत पहिलीच शिक्षक भरती होणार आहे. भरतीवेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबवण्यासाठी पोर्टलच्या माध्यामतून मदत होणार आहे. राज्यातील सुमारे पाच हजार शिक्षक अतिरिक्त झाल्याने समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या. यामध्ये सहा जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी दिसल्यामुळे तेथील बिंदूनामावलीची फेरतपासणी करून त्वरीत भरण्यात येणार आहेत.

पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, जेणेकरुन कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. सर्व संबंधित गटाशी विचारविनिमय केला, त्यांच्या सूचना विचारात घेतल्या. यामध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तींचे शिक्षक भरती प्रक्रिया यशस्वीपणे सुरु करण्यामध्ये योगदान आहे. यापुढे देखील अशाच प्रकारे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असेही विनोद तावडे यांनी सांगितले.

शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल. २ मार्चला शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार आहे. त्याचवेळी पवित्र पोर्टलवर ही जाहिरात उमेदवारांना पाहायला मिळणार आहे.

अशी असेल भरती
अनुसूचित जाती          १७०४
अनुसूचित जमाती        २१४७
अनुसूचित जमाती (पेसा) ५२५
व्हि.जे.ए.                 ४०७
एन.टि.बी.                २४०
एन.टी.सी                 २४०
एन.टी.डी.                १९९
इमाव                    १७१२
इ.डब्ल्यू.एस            ५४०
एस.बी.सी.               २०९
एस.ई.बी.सी.           ११५४
सर्व साधारण             ९२४
एकूण                  १०,००१

First Published on: March 1, 2019 6:11 AM
Exit mobile version