Lockdown Effect : सेव्हन हिल्स रुग्णालयात मेगाभरती

Lockdown Effect : सेव्हन हिल्स रुग्णालयात मेगाभरती

‘करोना’ विषाणूशी दोन हात करण्यासाठी आणि झपाट्याने होणारा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महापालिकेच्या अंधेरी रुग्णालयामध्ये ५५० पदांची भरती निघाली असून तीन महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेला १४ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. आयसोलेशन केंद्र मरोळ, अंधेरी येथील कोविड – १९ विभागामध्ये ही भरती निघाली असून यामध्ये वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहायक वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका यांची कंत्राटी पद्धतीने भरती निघाली आहे.

असा करा अर्ज; एवढे मिळणार वेतन

१. प्रशिक्षित अधिपरिचारिका (क्वालिफाईड स्टाफ नर्स)- ४०० पदे एकत्रित मानधन रु. ३० हजार दरमहा

पात्रता

१२ वी उत्तीर्ण आणि जीएनएम डिप्लोमा (नर्सिंग कॉन्सिलकडे रजिस्टेशन आवश्यक)

२. सहायक वैद्यकीय अधिकारी- १२० पदे

अ) एम.बी.बी.एस. – ६० पदे एकत्रित मानधन रु. ८० हजार दरमहा.
ब) बी.ए.एम.एस. – ३० पदे. एकत्रित मानधन रु. ६० हजार दरमहा
क) बी.एच.एम.एस. – ३० पदे एकत्रित मानधन रु. ५० हजार दरमहा.

पात्रता

संबंधित शाखेतील पदवी (एमएमसी किंवा एमसीआय कडे रजिस्टेशन आवश्यक.)

३. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार – ३० पदे एकत्रित मानधन रु. ३.५ लाख दरमहा

अ) इन्टेसिव्हिस्ट (एमडी – मेडिसिन)- १५ पदे
ब) अनेस्थटिस्ट (एमडी)- १० पदे क) नेफ्रॉलॉजिस्ट (डीएम)- ३ पदे
ड) कार्डिओलॉजिस्ट (डीएम)-1 पद) इ) न्यूरोलॉजिस्ट (डीएम)-1 पद.

पात्रता

उमेदवार संबंधित विषयातील डीग्री किंवा सुपरस्पेशालिटीस्ट डीग्री होल्डर असावा. (उमेदवार एमएमसी किंवा एमसीआयकडे रजिस्टर असावा)
वयोमर्यादाः- (दि.१९ एप्रिल २०२० रोजी) १८ ते ३३ वर्षे (अर्जासोबत जन्माचा दाखला/तत्सम प्रमाणपत्र सादर करावे)
(उमेदवाराने पदवी/पदविका परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास ती परीक्षा किती प्रयत्नांत उत्तीर्ण केली याचे प्रमाणपत्र सादर कराणे आवश्यक आहे.)

मुलाखतीचे स्थळ

अधिष्ठता कार्यालय, लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव , मुंबई-२२

मुलाखती दि. २० एप्रिल २०२० रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत घेतल्या जातील. अर्जासोबत उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रती आणि अलिकडेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यावर चिटकवून आणि जन्मतारखेचा दाखला/तत्सम प्रमाणपत्र सादर करावे.


हेही वाचा – बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग का होतो?; शास्त्रज्ञांनी केला खुलासा


 

First Published on: April 17, 2020 1:19 PM
Exit mobile version