सावधान! पुन्हा होणारा कोरोनाचा संसर्ग तीव्र

सावधान! पुन्हा होणारा कोरोनाचा संसर्ग तीव्र
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये अनेक डॉक्टरांचा समावेश आहे. पण जागतिक स्तारावर झालेल्या एका निरीक्षणामध्ये डॉक्टरांना दुसऱ्यांदा झालेला कोरोनाच संसर्ग हा तीव्र असल्याचे म्हटले आहे. पहिल्यांदा झालेला संसर्ग हा बऱ्याच अंशी लक्षणेविरहित होता. मात्र पुन्हा झालेली कोरोनाची लागण गंभीर असल्याचे म्हटले आहे. 
 
कोरोनाचा प्रादुर्भाव व त्याची लक्षणे यासंदर्भात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. लॅन्सेट अहवालात मांडण्यात आलेल्या एका निरीक्षणात डॉक्टरांना दुसऱ्यांदा झालेला कोरोनाच संसर्ग हा तीव्र असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत नोएडा येथील दोन डॉक्टर, मुंबईतील नायरमधील तीन डॉक्टर आणि हिंदुजा रुग्णालयातील एका डॉक्टरचा यामध्ये समावेश आहे. दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉस्टिक अँड इंटेग्रेटीव्ह बायोलॉजी काऊन्सिल ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च लॅबोरेटरी संस्थेला हा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये दुसऱयांदा कोरोनाची लागण झालेले डॉक्टर हे तरुण होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा झालेल्या संसर्गात कोणताही श्वसनविकार आढळला नाही. परंतु दुसऱ्यावेळी या डॉक्टरांना रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागत आहेत. यातील एका डॉक्टरवर तीन दिवस उपचार सुरु आहेत. आरोग्य कर्मचारी फ्रंटलाईनवर काम करणारे असल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते, असे या संशोधनात सहभागी असलेल्या नायर रुग्णालयातील डॉ. जयंती शास्त्री यांनी सांगितले.  संशोधन अहवाल जागतिक पातळीवर सुरु आहे. आपल्याकडे त्याचे प्रमाण अल्प असल्याचेही त्या म्हणाल्या.
First Published on: September 24, 2020 2:47 PM
Exit mobile version