एअरफोर्सच्या जागेवर पुर्नविकास

एअरफोर्सच्या जागेवर पुर्नविकास

सांताक्रुझ येथील एअर फोर्सच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्विकासाच्या दृष्टीने आता एक पाऊल पुढे सरकले आहे. सांताक्रुझ परिसरात रायफल रेंज म्हणून लोकप्रिय असणार्‍या एअऱफोर्सच्या जागेवर असणार्‍या झोपडीवासीयांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणानंतर आता जीआएस सर्वेक्षणाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता या जागेच्या पुर्नविकासासाठी एक सकारात्मक घडामोड घडली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या परिसरातील रहिवाशांना बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मिळालेल्या ना हरकत प्रमाणपत्राच्या आधारावर याठिकाणी बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले. नोव्हेंबर अखेरीस हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या कामादरम्यान ९४८३ झोपड्यांना क्रमांक देण्यात आले. तर ८७०६ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. आता या झोपड्यांच्या भागामध्ये लिडार यंत्रणेचा वापर करून जीआयएस सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.

काय आहे लिडार सर्वेक्षण ?

एखाद्या भागातील झोपडपट्ट्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी लिडार तंत्रज्ञानाचा वापर करून त्याठिकाणचा फोटो काढण्यात येतो. यासाठी रिफ्लेक्टेड लाईटचा आणि सेन्सरचा वापर करण्यात येतो. अनेकदा थ्री डी स्वरूपातील इमेजचा वापर सर्वेक्षणासाठी करण्यात येतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणचे सर्वेक्षण करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.

First Published on: November 19, 2019 2:54 AM
Exit mobile version