30 जानेवारीला मध्य रेल्वेच्या एसी लोकलला हिरवा झेंडा

AC LOCAL

मध्य रेल्वेच्या मार्गावर पहिली एसी लोकल गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतिक्षेत होती. मात्र आताही प्रतिक्षा संपली आहे. मध्य रेल्वेच्या वातानुकूलित (एसी ) लोकलचे उद्घाटन येत्या 30 जानेवारी रोजी होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एसी लोकलला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. उद्घाटनाची पहिली फेरी पनवेल ते ठाणे अशी चालविण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवार 31 जानेवारीपासून एसी लोकलच्या नियमित फेर्‍या ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहेत.

मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये डिसेंबर 19 च्या पहिल्या आठवड्यात चेन्नईस्थित आयसीएफ कारखान्यातून एसी लोकल दाखल झाली आहे. एसी लोकलच्या सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आताही लोकल रेल्वे रुळांवर धावण्यास सज्ज झालेली आहे. गुरुवारी दुपारी 3 ते साडे तीन वाजण्याच्या सुमारास रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी हे सीएसएमटीतून एसी लोकलला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

यावेळी एसी लोकलच्या उद्धाटनाची फेरी पनवेल स्थानकातून ठाण्याकरिता रवाना करण्यात येणार आहे. त्यानंतर 31 जानेवारीपासून ठाणे ते वाशी, नेरुळ, पनवेल दरम्यान नियमित दिवसाला 16 फेर्‍या होणार आहेत, असे रेल्वे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

असे असणार तिकीट दर

ठाणे ते वाशी – 130 रुपये
ठाणे ते पनवेल – 175 रुपये

First Published on: January 25, 2020 5:59 AM
Exit mobile version