ICU मध्ये असलेल्या कोरोना रुग्णांना आता नातेवाईक सीसीटीव्हीद्वारे पाहू शकणार

ICU मध्ये असलेल्या कोरोना रुग्णांना आता नातेवाईक सीसीटीव्हीद्वारे पाहू शकणार

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई आणि राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात आहे. त्यात आयसीयूमध्ये असणाऱ्या रुग्णांना नातेवाईक पाहू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यााच निर्णय घेतला आहे. ज्यामुळे नातेवाईक रुग्णाला पाहू शकतील.

एका वृत्तसंस्थेला माहिती देताना टोपे यांनी सीसीटीव्ही लावण्याबाबत सुतोवाच केले आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा समुह संसर्ग झालेला नाही, असे देखील टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत, ते संस्थात्मक क्वारंटाईन आणि होम क्वारंटाईन केलेले आहेत किंवा आधीच कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कातील आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचा समुह संसर्ग झालेला आहे, असा निष्कर्ष आताच काढता येणार नाही, असेही टोपे यांनी सांगितले.

First Published on: July 2, 2020 5:14 PM
Exit mobile version