दिलासा! दुर्मिळ आजारातून नऊ महिन्यांच्या कुनैनची मुक्तता

दिलासा! दुर्मिळ आजारातून नऊ महिन्यांच्या कुनैनची मुक्तता

अवघ्या नऊ महिन्याच्या बाळाला जन्मजात झालेल्या हाइपोपॅराथायरॉईडीझम या पॅराथायरॉईड ग्रंथीचा एक दुर्मिळ आनुवंशिक आजारातून डॉक्टरांनी शास्त्रक्रियेद्वारे मुक्त केले. या आजारामुळे बाळाला जन्मापासून सुस्तपणा, चिडचिडेपणा आणि कोणत्याही क्रियेमध्ये उत्तेजन न देणे असे त्रास होत होता. मात्र शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती सुधारत असून लवकरच त्याला घरी पाठवण्यात येणार आहे.

कुनैन सहा महिन्याचा असताना त्याला खूप ताप आल्याने आम्ही त्याला डॉक्टरकडे नेले असता त्यांनी त्याला न्यूमोनिया झाल्याचे सांगत तीन दिवस खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले. पण त्यानंतरही तब्येतीत सुधारणा नसल्याने त्याची रक्ततपासणी केली असता शरिरात कॅल्शियम खूप वाढल्याचे लक्षात आले. अधिक तपासणीनंतर त्याला पॅराथायरॉइडिजम किंवा हायपरकॅल्शियमचे निदान करण्यात आले. या आजारामुळे शरिरातील कॅल्शियमच्या पातळीचे नियमन केले जात नाही. त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आम्ही त्याला अपोलो हॉस्पिटल्समध्ये दाखल केले.

ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक, थायरॉईड आणि पॅराथायरॉईडचे डोके व मानेच्या कर्करोग शस्त्रक्रियांचे तज्ज्ञ डॉ. अनिल के. डिक्रुझ आणि त्यांच्या टीमने बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि आता बाळ स्थिरपणे प्रगती करत आहे. त्याचा चिडचिडेपणा कमी झाला आहे आणि ते पूर्वीपेक्षा जास्त उत्साही व सक्रिय बनले आहे. बाळावर सध्या डॉक्टर्स देखरेख करत असून त्याला लवकरच घरी पाठवले जाईल, असे बाळाचे वडील मोहम्मद मुदस्सीर अन्सारी यांनी सांगितले.

बाळांना होणारा हाइपोपॅराथायरॉईडीझम हा अतिशय दुर्मिळ आणि प्राणघातक देखील ठरू शकतो. जगात हातावर मोजण्याइतकी या आजाराची प्रकरणे आहेत. बाळांमध्ये पॅराथायरॉईड ग्रंथींचा आकार अतिशय लहान असतो. रंग अर्धपारदर्शक असतो. स्थिती अतिशय गंभीर आणि सतत बदलत राहणारी असते. त्यामुळे त्या ग्रंथी नेमक्या कुठे आहेत ते शोधून काढणे कठिण असते. तरीही आम्हाला असामान्य ग्रंथी काढून टाकता आल्या. तसेच पॅराथायरॉईड ग्रंथींचे ऑटो ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी विशेष तंत्राचा उपयोग करण्यात आम्ही यशस्वी झालो. यामुळे हे बाळ मोठे होत जाईल तसतसे त्याची कॅल्शियम रिप्लेसमेंटवर अवलंबून राहण्याची गरज कमी होत जाईल, असे ऑन्कोलॉजी विभागाचे संचालक, थायरॉईड आणि पॅराथायरॉईडचे तज्ज्ञ डॉ. अनिल के. डिक्रुझ यांनी सांगितले.

हेही वाचा –

…म्हणून कंगनाचा ‘हा’ हॉट आणि बोल्ड फोटो होतोय व्हायरल

First Published on: May 20, 2020 6:51 PM
Exit mobile version