रिलायन्स करणार जिओ फायबर लाँच; ७०० रुपयांत इंटनेट प्लॅन

रिलायन्स करणार जिओ फायबर लाँच; ७०० रुपयांत इंटनेट प्लॅन

मुकेश अंबानी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमटेडची (RIL) आज, सोमवारी मुंबईत ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. खनिज तेल उत्पादनातील मातब्बर कंपनी असलेली सौदी अरामको रिलायन्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली आहे. तसेच रिलायन्सच्या बहुप्रतिक्षीत जिओ फायबर योजनेचीही घोषणा त्यांनी केली असून जिओ लॉंचिंगच्या तिसऱ्या वर्धापनदिनी म्हणजेच येत्या ५ सप्टेंबरपासून जिओ फायबर लाँच होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा प्लॅन अगदी ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरात मिळणार आहेत.

काय म्हणाले मुकेश अंबानी

नव्या भारताचा उदय होत आहे. भारताची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. गेल्या वर्षभरात रिलायन्सचे मोठी भरारी घेतली. जिओने बाजारपेठेचा ३२ टक्के हिस्सा व्यापला आहे. रिलायन्स हा सर्वाधिक आयकर भरणारा उद्योग समूह आहे. १६०० शहरांमधून १५ दशलक्ष लोकांनी गिगा फायबरची नोंदणी केली होती. जिओ फायबर प्रायोगिक तत्वावर सुरू केले होते. जिओ फायबरमुळे तुम्हाला प्रकाशाच्या वेगाचा ब्रॉडबँड स्पीड मिळेल. याव्यतिरीक्त अन्य अनेक स्मार्ट होम सुविधा आहेत, अशी माहिती अंबानी यांनी यावेळी दिली.

तंत्रज्ञानाच्या जगाचा आनंद जिओ फायबरमुळे ग्राहकांना लुटता येणार आहे. याचे एक उदाहरण म्हणजे मिक्स्ड रिअॅलिटी, ‘ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीने तंत्रज्ञानाच्या जगात आमूलाग्र बदल घडवले. या दोहोंचं मिश्रण असलेली मिक्स्ड रिअॅलिटी (AR+VR)जिओ गिगाफायबरवर उपलब्ध होणार आहे,’ अशी घोषणा इशा अंबानी यांनी यावेळी केली.

हेही वाचा –

‘या’ चित्रपटांची आठवण करून देतोय सुशांत-श्रद्धाचा ‘छिछोरे’!

साराच्या वाढदिवसानिमित्त डेविड धवनची चाहत्यांना ‘ही’ भेट

First Published on: August 12, 2019 12:53 PM
Exit mobile version