या नंबरवर कॉल केल्यावर मिळेल रेमडेसिवीर इंजेक्शन 

या नंबरवर कॉल केल्यावर मिळेल रेमडेसिवीर इंजेक्शन 
रेमडीसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे होत असलेला काळाबाजार रोखण्यासाठी सिप्ला कंपनीने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ८६५७३११०८८ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर कॉल केल्यास रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपलब्धतेनुसार इंजेक्शन दिले जात आहे.
 
कोरोनावर दिलासादायक ठरत असलेले रेमडीसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र त्या तुलनेत इंजेक्शन उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेमडीसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. या काळाबाजाराला रोखण्यासाठी आणि सिप्ला कंपनीने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रेमडीसिवीर इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी ८६५७३११०८८ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकाने कॉल केल्यावर त्यांना सिप्लाच्या प्रतिनिधींकडून इंजेक्शनच्या उपलब्धतेनुसार इंजेक्शन कोणत्या डीलरकडे किंवा डिस्ट्रिब्युटर उपलब्ध असेल याची माहिती दिली जाते. त्यानुसार रुग्णाच्या नातेवाईकांनी डिस्ट्रिब्युटरशी संपर्क साधल्यावर त्याला इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाते.
 
सिप्ला कंपनीकडून हा टोल फ्री क्रमांक चार महिन्यांपूर्वी सुरु केला आहे. या क्रमांकावर दररोज ५०० पेक्षा अधिक कॉल रेमडीसिवीर इंजेक्शनसाठी येत आहेत. या सर्वांना इंजेक्शन कोणत्या डिस्ट्रिब्युटर आहे, त्याची किंमत किती आहे, कधी उपलब्ध होईल याची सर्व माहिती दिली जात असल्याची माहिती सिप्लाकडून सांगण्यात आली. 
First Published on: September 23, 2020 10:05 AM
Exit mobile version