कढीपत्ता वाढीसाठी ‘हे’ घरगुती उपाय एकदा करून बघाच

कढीपत्ता वाढीसाठी ‘हे’ घरगुती उपाय एकदा करून बघाच

घरगुती लावलेला कढीपत्ता कसा वाढवाल

कढीपत्त्याला ताकाचे पाणी घालण्याचे वैज्ञानिककारण म्हणजे कढीपत्त्याला एसिडिक माती लागते. जर माती एसिडिक नसेल तर कढीपत्ताची वाढ जोमाने होत नाही. मातीचा पीएच लेव्हल कमी करण्यासाठी म्हणजेच माती एसिडिक करण्यासाठी ताक टाकले जाते. ताक टाकल्याने कढीपत्ता ची वाढ चांगली व जोमाने होते. पण सरसकट कोणत्याही किंवा सगळ्याच झाडांना ताक टाकून चालत नाही ज्या झाडाला एसिडिक माती लागते त्यालाच ताक घालावे.

तसेच झाडांना आंबट ताक कधीही थेट घालू नये. तर,रात्री एक वाटी आंबट ताकांत चार ते सहा वाट्या पाणी घालावे, नीट ढवळावे आणि रात्रभर ठेवावे. म्हणजे सकाळी ताकातला स्निग्धांश तळाशी बसलेला असतो आणि केवळ निवळ वर असते. ही निवळ काळजीपूर्वक दुसर्‍या भांड्यांत ओतून घ्यावी,स्निग्धांश येऊ देऊ नये. ही निवळ फडक्यातून गाळून घ्यावी. ही  निवळ तुम्ही कढीपत्याच्या कुंडीत घालू शकता अथवा त्याची पानांवर फवारणी करु शकता. अतिशय चांगला परिणाम मिळतो. स्निग्धांश टाळल्यामुळे झाडाला अथवा कुंडीतल्या मातीला बुरशीची लागण होत नाही. कुंडीत मुंग्या होत नाहीत. महिन्यातून एकदा १ लि. ताकात ५ लिटर पाणी मिसळून साधारण १०० ते २०० मिली द्रावण झाडास घालावे.

मोठ्या कढीपत्याच्या रोपा जवळ छोटी छोटी रोपटी येतात ती वेगळी काढवीच लागतात नाहीतर त्यांची पुरेशी वाढ होत नाही. कढी पत्त्याच्या भरघोस वाढीसाठी झाडाचे कटिंग करणं हा एक उपाय आहेच, पण अजुनही एक अगदी सोपा उपाय आहे आणि तो म्हणजे ते झाड मोडणार नाही अशा हिशेबाने जमेल तितके वाकवा व वरचा शेंडा कापा आणि एखादा दोर वापरून जमिनीत एंकर करा. लवकरच वाकवलेल्या खोडावर बऱ्याच ठिकाणी नवीन अंकूर येऊ लागतील.
सोनचाफ्याच्या झाडाला सुद्धा या पध्दतीने चिक्कार फुले येतात व फुलं काढणेही सोपं होतं.

First Published on: February 26, 2020 9:47 AM
Exit mobile version