नवीन पनवेल परिसरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करा

नवीन पनवेल परिसरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करा

प्रातिनिधिक फोटो

नवीन पनवेल परिसरात सेक्टर ६ तसेच इतर विभागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या रस्त्यांची सिडकोने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सिडको नवीन पनवेल सहाय्यक अभियंता नाहने यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवीन पनवेल परिसरातील अनेक मुख्य रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले असल्याने गाडी चालवणे धोकादायक बनले आहे. या खड्ड्यांमुळे अपघातसुद्धा वाढले आहेत, तसेच गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तरी सिडकोने या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी विभागप्रमुख विश्वास पेटकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नवीन पनवेल शहरप्रमुख रुपेश ठोंबरे, विभागप्रमुख प्रमोद पाटील, महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, वावंजे विभागप्रमुख दत्ता फडके, मनोज कुंभारकर, दिनेश भोईर, चिटणीस शंकर देशेकर, वळवली शाखाप्रमुख प्रवीण पाटील, आकाश पेटकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. या मागणीची दखल घेत सिडकोकडून लवकरच या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.

First Published on: January 12, 2019 10:17 AM
Exit mobile version