विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांची ‘फळ विक्री’ मोहीम

विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांची ‘फळ विक्री’ मोहीम

नागपूर, अंबेजोगाई आणि औरंगाबाद या वैद्यकीय कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी सुरु केलेल्या ‘फळ विक्री’ या मोहिमेला मुंबईतील डॉक्टरांनी ही सपोर्ट केला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सायन हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर्स हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजाबाहेर फळ विकत होते. ऐरवी अॅपरन आणि स्टेथस्कोप घालून हॉस्पिटलमध्ये रुग्णांना तपासणारे डॉक्टर्स मंगळवारी हॉस्पिटलबाहेर फळ विकताना दिसत होते. त्यामुळे येणारे-जाणारे लोक, रुग्णालयात येणारे रुग्ण आणि नातेवाईक या स्टॉलकडे पाहून आश्चर्य व्यक्त करत होते. १५० हून अधिक निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या उपचारांवर या मोहिमेचा परिणाम होऊ नये यासाठी डॉक्टर त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे येऊन फळ विकत होते.

हेही वाचा – विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टर करणार ‘रास्ता रोको’

काय आहे नेमकं प्रकरण?

राज्यातील १००० निवासी डॉक्टरांना विद्यावेतन (स्टायपेंड) न मिळाल्याने डॉक्टर आंदोलन करत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. राज्यातील नागपूर, बीड, औरंगाबाद आणि लातूरच्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून स्टायपेंड मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी ‘फळ विक्री’ मोहिम हाती घेतली आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनीही फळांची विक्री केली.सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी केलेल्या आंदोलनानंतर जे.जे हॉस्पिटल येथील निवासी डॉक्टरही हॉस्पिटलमध्ये विरोध दर्शवणार आहेत.

गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अनेक हॉस्पिटल्समधील डॉक्टरांना विद्यावेतन दिलं जात नव्हतं. पण, आंदोलन करण्याचा निर्णय घेतला की, एका महिन्यात विद्यावेतन दिलं जायचं. पण, पुन्हा तीच परिस्थिती होती. त्यामुळे, अनेक डॉक्टर्सवर आर्थिक संकट आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यासह मुंबईतील डॉक्टर्सही शांततेच्या मार्गातून निषेध व्यक्त करत आहेत. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर डॉक्टरांचा उद्रेक होईल. मग, राज्यभर आंदोलन पुकारलं जाईल. त्यामुळे लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्यात येणार आहे.
– डॉ. लोकेश चिरवटकर, केंद्रीय मार्डचे अध्यक्ष

हेही वाचा – इंटर्न डॉक्टरांचा संप मिटला! आश्वासनानंतर निर्णय

काय आहेत मागण्या?

First Published on: December 25, 2018 3:45 PM
Exit mobile version