आजपासून २७ जूनपर्यंत मुंबईतील तिसऱ्या गटातील निर्बंध कायम – पालिका आयुक्त

आजपासून २७ जूनपर्यंत मुंबईतील तिसऱ्या गटातील निर्बंध कायम –  पालिका आयुक्त

आजपासून २७ जूनपर्यंत मुंबईतील तिसऱ्या गटातील निर्बंध कायम - पालिका आयुक्त

मुंबई महापालिका क्षेत्रातील तिसऱ्या गटातील निर्बंध आजपासून २७ जूनपर्यंत कायम राहतील,अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. (Restrictions on third group in Mumbai maintained from today till June 27 – Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) मुंबईचा आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेड हा ३.७९ टक्के इतका झाला आहे. तर ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर २३.५६ टक्के इतका आहे. यासर्व गोष्टींचा विचार केला असता मुंबईचा आता पहिल्या टप्प्यात समावेश होतो. मात्र हा समावेश केवळ आकडेवारीनुसार आहे.  मुंबईतील लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण, भौगोलिक रचना, उपनगरातून मुंबईत लोकलने दाटीवाटीने प्रवास करुन दररोज मुंबईत येणाऱ्या प्रवासांची संख्या त्याचप्रमाणे टास्क फोर्सने वर्तवलेली तिसऱ्या लाटेची शक्यता या सर्व कारणांमुळे मुंबई आकडेवारीनुसार पहिल्या टप्प्यात आहे असे म्हटले तरी मुंबईत २७ जूनपर्यंत तिसऱ्या टप्प्यांतील निर्बंध लागू राहणार आहेत. २७ जून नंतर आढावा बैठक घेऊन,मुंबईच्या सध्याच्या परिस्थितीवर योग्य आणि सविस्तर चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येतील, असे मुंबई पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

शासनाने जाहिर केलेल्या सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टंसिंग ,मास्क वापरणे आणि इतर उपाययोजनांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा विचार केला असता मुंबईत काल म्हणजेच २१ जून रोजी ७३३ नव्या बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईचा रिकव्हरी रेट ९५ टक्के इतका आहे. तर मुंबईत सध्या १४ हजार ८०९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


हेही वाचा – Mumbai Local Update: मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागणार; वडेट्टीवार यांनी केलं मोठं विधान

 

First Published on: June 21, 2021 12:38 PM
Exit mobile version