उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाची हत्या

उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोमवारी अंबरनाथ- बदलापूर रोडवर दगडाने ठेचून रिक्षाचालकाची हत्या करण्यात आली. हिललाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांना रात्री हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

पूर्ववैमनस्यातून हत्या

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मध्ये राहणाऱ्या संतोष प्रविण जुबेलू या २३ वर्षाच्या रिक्षाचाकाची हत्या करण्यात आली आहे. पोलीस दिलेल्या माहितीनुसार, किरण मांडवकर याच्या भावाला संतोषने मारहाण केली होती. त्या रागातूनच संतोषची हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी संतोषला अंबरनाथ-बदलापूर रोडवरील अश्विनी ढाब्यासमोरी झाडाझुडपात नेऊन मारहाण केली. त्यानंतर त्यांनी संतोषच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केली.

३ आरोपींना अटक

संतोष जुबेलू हत्या प्रकरणी पोलिसांनी किरण मांडवकरसह त्याचा मित्र गणेश सुंके आणि सन्नी सकपाळ या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीनंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास हिल लाईन पोलीस करत आहे.

First Published on: September 11, 2018 12:31 PM
Exit mobile version