GoodNews! एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार – ५५० कोटी रुपये मंजूर!

GoodNews! एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार – ५५० कोटी रुपये मंजूर!

राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनासाठी ५५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी या निर्णयाची ट्विटरवरुन माहिती दिली.  तसेच कर्मचाऱ्यांचे पगार लवकर होणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

“माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार! उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५५० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील.”असे अनिल परब यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या बैठकीला अजित पवार, अनिल परब आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ५५० कोटी मंजूर झाल्याने एसटीच्या १ लाख १० हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. परंतु ५५० कोटी रूपये जरी थकबाकी वेतनासाठी मंजूर करण्यात आले असले तरी सर्व कर्मचाऱ्यांचा थकीत वेतन पूर्णपणे देण्यात येईल, इतका निधी अपुरा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा हा गेल्या २ ते ३ महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपला, असे म्हणता येणार नाही. कारण पुन्हा राहिलेल्या वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या लढावेच लागणार आहे.


वेतन द्या अन्यथा आत्महत्या करूद्या…

First Published on: August 4, 2020 3:22 PM
Exit mobile version