ठाकरे सरकारमधील अजून एक मंत्री Corona Positive!

ठाकरे सरकारमधील अजून एक मंत्री Corona Positive!

एकीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असताना त्याचा शिरकाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात देखील झालेला आहे. अशोक चव्हाण यांच्यापासून मंत्र्यांना कोरोनाची बाधा व्हायला सुरुवात झाली होती. नुकतेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुश्रीफ यांनी स्वत: ट्वीट करून याबद्दलची माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील स्वत:ची तपासणी करून घ्यावी. लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे’, असं मुश्रीफ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

First Published on: September 18, 2020 5:38 PM
Exit mobile version