एसटीमुळे ग्रामीण विद्यार्थी परीक्षा पासून वंचित

एसटीमुळे ग्रामीण विद्यार्थी परीक्षा पासून वंचित

एसटी महामंडळ

गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी हे ब्रीद वाक्य असणार्‍या एसटी महामंडळाच्या आपल्या कर्तुत्वाला चुकते आहे का ? एसटी बसेस वेळेत न आल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थाना परीक्षा पासून वंचित राहत लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थानेचे मोठे नुकसान होत आहे. या संबंधित तक्रारी ग्रामीण भागातील विद्यार्थानी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या कडे केली आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना जोडण्याचे काम एसटी कडून करण्यात येते. आज ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात आपले शिक्षण घेण्यासाठी एसटीच्या प्रवास करता. मात्र अनेकदा एसटीला उशीर झाला, तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. या संबंधित अनेक विद्यार्थींनी आगार प्रमुखा या संबंधित तक्रारी दिल्या होत्या. मात्र यावर कसली सुनावाई होत नव्हती. मात्र सद्या राज्यात सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवासाकरिता एसटीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत एसटीला उशीर झाला, तर परीक्षा पासून वंचित राहत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. परीक्षा काळात तरी एसटी वेळेत येण्याकरिता विद्यार्थीं थेट परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कडे राज्यातील ग्रामीण भागातून दूरध्वनी द्वारे अनेक तक्रारी प्राप्त झाले आहेत. त्यामुळे रावते यांना आपल्या विभागात काय चालत आहे. यांची जाणीव झाली. या तक्रारीची दखल घेत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून महामंडळाने परिपत्रक काढलेले आहे. राज्यातील एसटीच्या प्रत्येक विभागातील कोणत्याही आगाराच्या फेरीच्या अनियमिततेमुळे कोणीही विद्यार्थी कोणत्याही परीक्षेपासून वंचित राहिला तर त्यांची गंभीर दखल घेण्यात येईल. सर्व विभाग नियंत्रकांनी विभागांतर्गत यंत्रणा राबवून अशी कोणतीही घटना आपल्या विभागात घडणार नाही, याची व्यक्तिश दक्षता घ्यावी, असे आदेश महामंडळाने दिलेले आहेत. त्यामुळे या परीक्षा काळात एसटी महांडळ जोमात कामाला लागले आहेत.

ग्रामीण भागातील एसटीच्या फेर्‍यावर लक्ष द्या ?
राज्यात सध्या १२ वीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे महामंडळाच्या एसटी सेवेतील अनियमिता चव्हाटयावर आली आहे. कारण विद्यार्थाना यांच्या मोठा फटका बसला आहे. मात्र वर्ष भर एसटी बसेसची अशी अवस्था असते. एसटी चे काम पारदर्शक व्हावं यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण आवश्यक आहे. एसटी ही ग्रामीण भागात राहणार्‍या लोकांसाठी जीवन वाहिनी आहे. परंतु एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे आज गाव तिथे एसटी गेली कुठे ? असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिक विचारल्या जाऊ लागलेला आहे. कित्येक गाव हप्त्यातून दोन किंवा तीन दिवसांनी एसटी येतं असते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला समोर जावे लागतं आहे. एस.टी महामंडळचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ग्रामीण भागातील एसटीच्या फेर्‍यावर लक्ष घालणे आवश्यक आहे. अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांनी दैनिक आपलं महानगरला सांगितले आहे.

First Published on: February 25, 2019 4:31 AM
Exit mobile version