उल्हासनगमधील सचदेव इमारतीचा स्लॅब कोसळला

उल्हासनगमधील सचदेव इमारतीचा स्लॅब कोसळला

उल्हासनगर येथील कॅम्प १ मधील सचदेव इमारतीचा स्लॅब रात्री उशिरा कोसळल्याची घटना घडली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन इमारत सील केली आहे. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील दहा इमारती मागील महिनाभरात सील केल्या आहेत. अंबिका सागर, शिवलीला, मंगलम, धर्म पॅलेस, रत्न पॅलेस ह्या इमारती क्षतिग्रस्त झाल्यामुळे सील केल्या आहेत. त्यामुळे शेकडो रहिवाशी कुटुंबियांचा प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतींचे स्लॅब पडण्याची आणखीन एक घटना उल्हासनगर शहरात घडली आहे.

कॅम्प १ मधील पोस्ट ऑफिस जवळ सचदेव अपार्टमेंट आहे. ह्या इमारतीच्या ३०२ सदनिकेचा स्लॅब २०२ सदनिकेत कोसळला. ह्या घटनेची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय जाधव, अग्निशामक दलाचे अधिकारी, पालिका कर्मचारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचले. जाधव यांनी ह्या तीन मजली इमारतीत राहणाऱ्या कुटुंबाना झटपट इमारत खाली करून इमारत सिल केली.

First Published on: August 21, 2019 9:39 PM
Exit mobile version