जैन साधूंना प्रवास करण्यास परवानगी; ‘हे’ आहेत प्रवासाचे नियम

जैन साधूंना प्रवास करण्यास परवानगी; ‘हे’ आहेत प्रवासाचे नियम

जैन साधू-साध्वी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून आता लॉकडाऊनचा ५ वा टप्पा सुरू आहे. असे असताना देशासह राज्यात कोरोनाचे संकट अधिक गंभीर होताना दिसतंय. अशा परिस्थितीत कोणीही विनाकारण घरा बाहेर पडू नये असे अवाहन देखील करण्यात येत आहे.

दरम्यान, सातत्याने होणाऱ्या कोरोना रूग्णांमधील वाढत्या आकडेवारीमुळे ठाकरे सरकारवर विरोधकांकडून चांगलाच हल्लाबोल देखील होताना दिसतोय. अशावेळी ठाकरे सरकार सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. आता जैन समाजाच्या चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर साधू-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी दिली असून त्याकरता काही अटी आणि नियमांचे पालन मात्र त्यांनी जैन समाजातील साधूंना सांगितले आहे.

जुलै महिन्यात जैन समाजाच्या चातुर्मास पर्वास सुरूवात होत असून, या काळात जैन समाजाचे साधू-साध्वी ठराविक चातुर्मास स्थळ गाठण्यासाठी पायी प्रवास करत असतात. यावेळी काही वयोवृद्ध साधू-साध्वी व्हिल चेअर्सचा आधार घेऊन देखील रस्त्याच्या कडेने प्रवास करताना बघायला मिळतात. असा प्रवास करून ते साधू-साध्वी ठराविक स्थळी त्यांच्या सेवकांसह पोहोचतात. मात्र यंदा लॉकडाऊन असल्याने अनेक भागातून ते प्रवास करू शकत नाही.. परंतु चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना निर्धारित स्थळी पोहोचणे आवश्यक आहे. मात्र त्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी जैन समाजाच्या साधू-साध्वींना तसेच त्यांच्या सेवक वर्गास काही अटी नियमांसह प्रवास करण्याची मुभा सरकारने दिली आहे.

‘या’ नियमांचे करावे लागणार पालन


सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान दंड आणि तुरुंगवास होणार
First Published on: May 30, 2020 6:22 PM
Exit mobile version