महापूरातून वाचलेल्या २ महिन्याच्या बाळाचा संघर्ष

महापूरातून वाचलेल्या २ महिन्याच्या बाळाचा संघर्ष

वाडिया रुग्णालय

कोल्हापूर, सांगली आणि इतर परिसरात आलेल्या महापूरामुळे तिथल्या रहिवाशांचं मोठं नुकसान झालं. अख्खा संसार पाण्याखाली गेल्याने पुन्हा कशी सुरुवात करायची? असा प्रश्न इथल्या प्रत्येक नागरिकाला पडला आहे. एकीकडे संसाराचं नुकसान तर दुसरीकडे जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर दुसरीकडे १७ जणांना सांगलीत बोट बुडाल्याने जीव गमवावा लागला होता. या पुरामुळे पसरलेल्या रोगराई आजार यामुळे आता येथील रहिवाशांच्या तसंच लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मुंबईच्या वाडीया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

या पुरामुळे सांगलीतील शिंदे कुटूंबिंयावर ही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिंदे कुटुंबातील २ महिन्यांच्या चिमुरडीला वाचवण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं. पण, ही चिमुरडी पुराच्या पाण्यामुळे न्युमोनिया ग्रस्त झाली आहे. पुढे, उपचार सुरू असताना समजलं की तिला हदयदोष झाला आहे. त्यामुळे, हे कुटुंबिय सध्या दुखाच्या डोंगराखाली आहे. आधीच पुरामुळे झालेली दैना आणि आता या बाळाला असलेला ह्रदयदोष या बातमीने पुर्णत: ते कोलमडून पडले आहे. पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवणे गरजेचे असल्याने एका सामाजिक संस्थेच्या मदतीने त्यांनी मुंबई गाठली आणि आता तिच्यावर मुंबईतील वाडीया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

भाजी विक्रेता असलेल्या संदिप शिंदे यांची पत्नी आणि संसार पूर्णतः पुरात वाहून गेला. त्यातच आता आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या चिमुरडीला ह्रदयदोष झाल्यामुळे त्यांचं मन सध्या नैराश्यग्रस्त झालं आहे. आता या बाळाला जीवनमरणाच्या संघर्षातून बाहेर काढण्यासाठी शिंदे कुटुंबियांसह वाडीया हॉस्पिटलचे अथक प्रयत्न सुरू आहेत.


हेही वाचा – नद्यांचे ऑडिट आणि पूररेषेवर नियंत्रणच रोखेल महापूर


First Published on: August 16, 2019 5:10 PM
Exit mobile version