‘प्रत्येकाने आपले पाय जमिनीवर आहेत की नाही, हे पाहायला हवे’

‘प्रत्येकाने आपले पाय जमिनीवर आहेत की नाही, हे पाहायला हवे’

शिवसेना खासदार संजय राऊत

‘विरोधी पक्षाने मागणी केली म्हणून सरकार चालत नाही किंवा सरकारमध्ये उलथापालथ होत नाही. गेल्या ७२ तासामध्ये एका पत्रामुळे आणि पोलीसामुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत, हे मान्य करण्याचा मोठेपणा माझ्याकडे आहे. कारण मी त्या सरकारचा चाराण्याचा चहाचा ओशाळलेला नाही आहे. सरकारवर उडालेले शिंतोडे कसे धुऊन काढायचे आणि स्वच्छ प्रतिमेने कसे बाहेर आले पाहिजे. या संदर्भात सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने आपले पाय जमिनीवर आहेत की नाही, हे पाहायला हवे’, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या सत्तेत असणाऱ्या व्यक्तींवरच हल्लाबोल केला आहे.

पवारांशी चर्चा करणार

‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले आहे. याबाबत आज दिल्लीत जाऊन शरद पवारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच या पत्राबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्यता तपासतील. त्याचप्रमाणे राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे असे आरोप होणे दुर्दैवी आहे’, असेही ते पुढे म्हणाले.

परमबीर सिंह उत्तम अधिकारी

‘विरोधकांनी हे आरोप केले नसले तरी जे आरोप केले आहेत. ते माजी मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. तसेच परमबीर सिंह हे उत्तम अधिकारी आहेत. या सर्व प्रकरणातून एकच सांगतो की, सरकारमधील प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे. विशेष म्हणजे राज्यकर्त्यांनीही कणा कायम मजबूत ठेवावा’.

ट्विटबाबत लवकरच कळेल

‘संजय राऊत यांनी सकाळीच एक ट्विट केले आहे. या ट्विट बाबत त्यांना विचारणा केली असता. त्याबाबत तुम्हाला लवकरच कळेल’, असे म्हणाले.


हेही वाचा – मुंबईतून 100 कोटी तर ठाण्यातून किती?


 

First Published on: March 21, 2021 9:12 AM
Exit mobile version