‘राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला माहित नाही’

‘राठोड यांच्या राजीनाम्याबाबत मला माहित नाही’

शिवसेना नेते संजय राऊत

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव प्रखर्षाने पुढे येत असून विरोधकांकडून त्यांच्याकडे राजीनामाची मागणी केली जात आहे. याबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे विचारणा केली असता याबाबत मला माहिती नाही, असे म्हणत त्यांनी संजय राठोड प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ केली आहे. ‘संजय राठोड हा विषय सरकारचा आहे. याप्रकरणात सरकारचे प्रमुख लोक मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख, मंत्री, कार्यकर्ते, अनेक वर्ष आमदार, शिवसेनेचा चेहरा आहे. पण, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्रीच माहिती घेऊ शकतात.’

शिवसेनेत दोन गट नसतात

संजय राठोड यांच्यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याचे बोले जात आहे. एका गटाकडून संजय राठोड यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसऱ्या गटाकडून राजीनामा न देण्याचा आग्रह केला जात आहे. यावर संजय राऊत यांना विचारणा केली असता. ‘शिवसेनेत दोन गट नसतात. हा विषय सरकारचा आहे. सरकारी पातळीवरच याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे याबाबत मला माहिती नाही. तसेच जी बैठक होणार आहे. त्या बैठकीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्याचप्रमाणे सरकार कोणतीही भूमिका घेत नाही, असे बोलू शकत नाही. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. त्यामुळे सरकार काही भूमिका घेत नाही, असे बोलू शकत नाहीत.

मुख्यमंत्री राठोड यांचा राजीनामा स्वीकारणार का?

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा ‘मातोश्री’वर पाठवल्याची माहिती समोर येत आहे. संजय राठोड यांचे नाव आल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारत राठोडांनी आपला राजीनामा पाठवला असल्याचे बोले जात आहे. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राठोड यांचा राजीनामा स्वीकारणार का? त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार का? हे पाहाव लागणार आहे.


हेही वाचा – मुंडेंना वाचवले आता राठोडांना ठाकरे सरकार वाचवतंय, किरीट सोमय्यांची सरकारवर चौफेर टीका


 

First Published on: February 16, 2021 11:19 AM
Exit mobile version