लाखो शेतकऱ्यांचा अंत पाहताय का? – संजय राऊत

लाखो शेतकऱ्यांचा अंत पाहताय का? – संजय राऊत

भाजप मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील, संजय राऊतांचे रोखठोक वक्तव्य

आज पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका मांडली. पंतप्रधानांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करायला हवं, असं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. उद्यापासून संसद सुरू होत असून शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर विरोधी पक्ष अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र यापूर्वीच शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला आणि थेट पंतप्रधानांनी संवाद साधून शेतकरी नेत्याना आश्वासन दिलं तर तोडगा सन्मानाने निघेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान, उगाच शेतकऱ्यांचा बळी जाणं आणि त्यातून ठिणगी पडणं, हे योग्य नाही, असेही संजय राऊत म्हणाले तर लाखो शेतकऱ्यांचा अंत का पाहताय, असा प्रश्नही केंद्रासमोर त्यांनी उपस्थितीत केला.

पंतप्रधान मोदींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात योग्य ती पावले उचलावी, शेतकरी आंदोलन आणि त्यासंदर्भात चर्चा करावी. ज्या प्रकारे आज पंतप्रधान मोदी यांनी सर्व पक्षीय बैठकीत जी भूमिका घेतली ती ६० दिवसांपूर्वीच घ्यायला हवी होती, असे म्हणत आजच्या बैठकीतील पंतप्रधानांच्या भूमिकेचं स्वागतही संजय राऊत यांनी केलं. शेतकरी नेते आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये पंतप्रधानपदाविषयी आदर आहे. त्यामुळे ते मोदींचा शब्द डावलणार नाहीत, असेही राऊत यांनी म्हटले.

पश्चिम उत्तर प्रदेशात शुक्रवारी दडपशाहीने शेतकरी आंदोलन उखडून टाकण्याचे प्रयत्न झाले. यावेळी पोलिसांनी आणि भाजप समर्थक जमावाने शेतकऱ्यांवर लाठीमार आणि दगडफेक केली. त्यानंतर हे आंदोलन संपेल असे वाटत असतानाच आंदोलकांनी राकेश टिकेत यांच्या डोळ्यातील अश्रू पाहिले. त्यानंतर याठिकाणी पुन्हा मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. तेव्हा पोलिसांनी येथून काढता पाय घेतला. कोणत्याही बाजूने दगडफेक झाली तरी आपल्याच लोकांची डोकी फुटणार आहेत, हे भाजपने लक्षात घ्यायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मोदींनी केली आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट

आज पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधानांनी कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका मांडली. यावेळी मोदी म्हणाले, ”मी नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे की, शेतकऱ्यांपासून ते फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत.” यासह “सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. सर्व विषयांवर चर्चा केली जाईल. सर्व पक्षांना आपली भूमिका मांडण्याची संधी दिली जाईल. कृषीमंत्री नरेद्र सिंह तौमर यांच्याकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. आपल्या समर्थकांना याबद्दल सांगावं. चर्चेतूनच तोडगा निघायला हवा. आपण सगळ्यांनी देशाबद्दल विचार करावा लागेल,” असे आवाहन मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केले.

First Published on: January 30, 2021 4:50 PM
Exit mobile version