चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन; जे पोटात मळमळत होते, ते ओठावर आले, संजय राऊतांचा टोला

चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन; जे पोटात मळमळत होते, ते ओठावर आले, संजय राऊतांचा टोला

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. त्याच्या विधानावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. यावेळी भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रकार नाही. तिथे मनमोकळेपणाने बोलता येत नाही. पण तरीही चंद्रकात पाटील यांचे मी अभिनंदन करतो. ते भाजपचे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांनी काल कोल्हापूरचे पाणी दाखवले. त्यांचा कोल्हापूरशी फार संबंध नसला ते पुण्यात आले असले तरी त्यांनी कोल्हापूरचे पाणी दाखवले. जे पोटात मळमळत होते, ते ओठावर आले. नंतर त्यांना ही भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे, असा खुलासा करावा लागला. मात्र, जर ही भाजपची भावना आहे तर त्या भावनेचा आदर व्हायला हवा होता, असे संजय राऊत म्हणाले.

हे सरकार अंतर्गत कलहाने पडेल –

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. यावेळी मिस्टर फडणवीस असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या विरोधात टीका केली. शिंदे फडणवीस सरकार जास्त काळ टिकणार नाही. आम्ही भाजपा सारखे करणार नाही. अकरा दिवसात सरकार पडेल, एवढ्या दिवसात सरकार पडेल. आम्ही तारखाही देणार नाही. त्यावेळी त्यांच्या पिपाण्या वाजत होत्या. त्यांना जे काही पिपाण्या, सनई चौघडे वाजवायचेत ते वाजवू द्यात. पण हे सरकार मजबूत राहणार नाही. हे सरकार अंतर्गत कलहाने पडेल, असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना काल पैठणला दिसली –

दरम्यान आधी सरकार स्थापन करा. एक महिन्यामध्ये हम दोनो, एक दुजे के लिए याच स्क्रिप्टमध्ये अडकून पडला आहात. कितीवेळा दिल्लीला जाताय? किती वेळा? मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील. ठिक आहे. भाजपचे राज्य आहे. ते म्हणत असतील शिंदेगट शिवसेना आहे. पण ती शिवसेना नाही. शिवसेना काल पैठणला दिसली, असे संजय राऊत म्हणाले.

तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसू नका –

माणूस किती बेमालूमपणे खोटे बोलू शकतो. असत्याला सत्य करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे सत्यच असते. लाखो करोडो मराठी माणसे अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसला. सरकार स्थापन केले. तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसू नका, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

First Published on: July 24, 2022 10:58 AM
Exit mobile version