पक्षांच्या खाण्यापिण्याची सोय; दहा हजार पॉटचे मोफत वाटप

पक्षांच्या खाण्यापिण्याची सोय; दहा हजार पॉटचे मोफत वाटप

दहा हजार पॉटचे मोफत वाटप

शहरीकरणात झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याने पक्षांच्या निवाराची समस्या निर्माण होत आहे. पक्षांमुळे बीज प्रसार होतो. निसर्गाची सुंदरता वाढली जाते. कीटक नियंत्रण राखले जाते. तसेच निसर्गाचा समतोल राखला जातो. त्यामुळे पक्षांसाठी पाणी आणि खाद्य मिळविण्यासाठी योगदान फाऊंडेशने पुढाकार घेतला असून, त्यांच्यासाठी विशेष पॉट तयार करण्यात आले असून सुमारे दहा हजार पॉटचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

पक्षी संवर्धनाची बिकट समस्या

वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या अनुपलब्धता, अन्नाची अनुलब्धता, शहरातील वाढते प्रदूषण यासारख्या अनेक कारणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पशु-पक्षांसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे. पक्षी संवर्धनाची बिकट समस्या उभी झाली आहे. त्यामुळे पक्षी नामेशेष होण्यापासून वाचविण्यासाठी आणि निसर्गसौंदर्य टिकविण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले. योगदान फाऊंडेशनचे अध्यक्ष मदन चव्हाण, सचिव रितेश कांबळे, कोषाधक्ष मनिष चव्हाण आणि सभासद सुनिल शिंदे, प्रकाश कांबळे, लुकेश नंदनवार, विनायक कांबळे ही सर्व मंडळी एकत्रीत येऊन पक्षी संवर्धनाचे कार्य सुरू केले. तसेच विविध शाळेत जाऊन पक्ष्यांच्या उपयोगी पाण्याचे पॉट उपलब्ध करून दिले आहेत.

पक्षी सौंदर्य जोपासना करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपण विकास कार्यासाठी हजारो झाडांची कत्तल करतो आणि त्या ठिकाणी आपल्या राहण्याची सोय करतो. पण ज्या ठिकाणी पक्षांचा वास्तव्य होते. याचा विचार आपण करत नाही. पक्षी हे निशब्द असल्यामुळे त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोचत नाही पण आता तरी जागे व्हा त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे, वस्ती करण झालेल्या ठिकाणी पाणी आणि खाद्य उपलब्ध करावे. जेणेकरून त्यांना मुबलक प्रमाणामध्ये खाद्य पाणी उपलब्ध होईल या उद्देशाने हे पॉट तयार करण्यात आले आहेत. नागरिकांसाठी मोफतपणे वाटप करण्यात येत असल्याचे फाऊंडेशनच्यावतीने सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – पक्षीतीर्थावर प्रथमच फ्लेमिंगोंचा वर्षभर मुक्काम


 

First Published on: September 18, 2019 9:18 PM
Exit mobile version