इलेक्ट्रीक बस खेरदीत घोटाळा, भाजपचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

इलेक्ट्रीक बस खेरदीत घोटाळा, भाजपचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

भाजपचे आमदार अमित साटम यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. साटम यांनी इलेक्ट्रिक बस खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. अंतिम मुदतीच्या काही तास आधीच निविदेची अटच बलण्यात आली असा आरोप साटम यांनी केला. यासंदर्भातील पत्र केंद्रीय सतर्कता आयुक्त यांना पत्र लिहिले आहे.

अमित साटम यांनी व्हिडिओ शेअर करत आरोप केला आहे. “मुंबई महापालिकेत आदित्यसेनेची भ्रष्टाचाराची शृखंला सुरूच आहे. त्यामुळे आम्हीपण आमची ‘पोलखोलची ‘ मालिका सुरूच ठेऊ व यांचे जनतेच्या हक्काचे पैसे लुबाडणारे काळे धंदे उघडे पाडू. आदित्यसेना इतके दिवस काही खास कंपन्यांना फायदा व्हावा यासाठी निविदा काढत असे, पण आता मात्र ऐनवेळी सिविसीच्या गाईडलाईन व नियमांमध्येच थेट मोडतोड करून टक्केवारीसाठी विदेशी कंपन्यांना मार्ग मोकळा केला गेला,” असा आरोप साटम यांनी केला.

“इलेक्ट्रीक बस खरेदीच्या निविदा प्रक्रीया पार पडत असताना २५ एप्रील रोजी बिडींगची डेड लाईन संपण्याचा केवळ दिड तास आधी यांनी थेट निविदेची पात्रता अटच बदलून टाकली. एवढ्या घाईगरबडीत कुणाच्या फायद्यासाठी संपूर्ण नियमांची पायमल्ली केली जातेय. आणि यात स्पष्टपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर होतोय हे दिसतंय. या सर्व प्रकारात प्रशासकीय अधिकारी इक्बालसिंग चहल आणि आदित्यसेना सामिल असल्यामुळे या महाभकास आघाडी सरकारकडनं यांच्यावरती पायबंद घातला जाणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळेच मी सेंट्रल व्हिजीलन्स कमिश्नरकडे तक्रार दाखल केली आहे व या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी विनंती केली आहे,” असं अमित साटम म्हणाले.

 

First Published on: April 29, 2022 4:42 PM
Exit mobile version