आरटीईसाठी शाळा वाढल्या जागा घटल्या

आरटीईसाठी शाळा वाढल्या जागा घटल्या

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (आरटीई) अंतर्गत राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरू झाली. मात्र यंदा आरटीईसाठी राज्यभरातून तब्बल 133 शाळा वाढल्या आहेत. मात्र त्याचवेळी तब्बल गतवर्षीच्या तुलनेत 1 हजार 617 जागा कमी झाल्या आहेत. गतवर्षी 9 हजार 195 शाळा होत्या यावर्षी त्यांची संख्या 9 हजार 328 इतकी झाली आहे. राज्याप्रमाणे मुंबईतही 11 शाळांची वाढल्या असून, 289 जागांमध्ये घट झाली आहे. आरटीईअंतर्गत राज्यातून दोन दिवसांत 24 हजार 643 तर मुंबईतून 1 हजार 660 विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले आहेत.

आरटीई कायद्यांतर्गत 25 टक्के आरक्षणांतर्गत राबवण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांच्या नोंदणीसाठी राज्यभरात सुरुवात झाली आहे. यामाध्यमातून खासगी शाळांमध्ये एकूण क्षमतेच्या 25 टक्के जागा आरटीई प्रवेशासाठी राखीव ठेवल्या जातात. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा अनेक शाळांनी अल्पसंख्याक मार्गाने पळवाट काढली असून याचा परिणाम नोंदणीवर झाला आहे. राज्यामध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश देणार्‍या शाळांमध्ये वाढ झाली असली तरी जागांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यात 9 हजार 328 जागांमध्ये 1 लाख 15 हजार 191 जागांची नोंदणी झालेली आहे. त्यावर दोन दिवसांत 24 हजार 643 पालकांनी अर्ज केले आहेत. तर मुंबईत डीवायडी अंतर्गत शाळांची वाढ झाली असली तरी पालिका शाळांत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. 29 फेब्रुवारीपर्यंत पालकांना अर्ज करण्याची संधी आहे. त्यानंतर 11 व 12 मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रिया चालणार असून एकदाच काढली जाणार आहे. त्यानंतर प्रतिक्षा यादीनुसार 3 टप्यात प्रवेश दिले जाणार आहे.

असे झाले गतवर्षी प्रवेश
शाळा : 356
आलेले अर्ज : 11,584
प्रवेश : 3,449

First Published on: February 15, 2020 3:06 AM
Exit mobile version