ठरलं! उद्या शाळा सुरू होणार नाहीत; आमदार कपिल पाटील यांनी केला संभ्रम दूर

ठरलं! उद्या शाळा सुरू होणार नाहीत; आमदार कपिल पाटील यांनी केला संभ्रम दूर

जून महिन्याच्या मध्यापर्यंत शैक्षणिक वर्षाला सुरूवात होत असतानाच या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून राज्यासह देशातील शाळा-कॉलेज बंद आहेत. मात्र १ जूनपासून राज्यात अनलॉक पद्धतीने काही गोष्टींमध्ये शिथिलता आणण्यात आली असून शाळा सुरू होणार की नाही याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. परंतू, या संभ्रमावर आता पडदा पडला असून उद्यापासून शाळा सुरू होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षण व पालकांमधील गोंधळ दूर होणार आहे. याबाबतची माहिती आमदार कपिल पाटील यांनी दिली आहे.

काय म्हणाले कपिल पाटील 

उद्या शाळा सुरू होणार नाहीत, असे स्पष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार कपिल पाटील यांना आज रात्री उशिरा सांगितले. उद्या १५ जून शिक्षकांनी शाळेत जाण्याची गरज नाही. वर्क फ्रॉम होम करावे. शाळा कधी सुरू करायच्या त्याचा निर्णय उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन केला जाईल, असे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी रात्री ८.३० वाजता आमदार कपिल पाटील यांना सांगितले. शाळा उद्या सुरू करण्याचे आदेश शिक्षण अधिकारी यांनी दिले होते. त्यामुळे प्रचंड गोंधळाचे व संभ्रमाचे वातावरण होते.

अखेर आमदार कपिल पाटील यांच्या मध्यस्तीनंतर शिक्षण आयुक्त रात्री उशिरापर्यंत याबद्दलचे आदेश काढण्यात येणार आहेत. शिक्षण आयुक्त यांनी फोनवरून कपिल पाटील यांना आदेश आलेले आहेत. आम्ही कळवत आहोत, असे सांगितले आहे. त्यामुळे उद्यापासून शैक्षणिक वर्ष जरी सुरू होत असले, तरी शाळा मात्र सुरू होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहेत.

हेही वाचा –

कंटेन्मेंट झोन मोकळा करण्यासाठी रहिवाशी उतरले रस्त्यांवर

First Published on: June 14, 2020 10:30 PM
Exit mobile version