दिव्यांश अजूनही सापडला नाही; शोध सुरुच

दिव्यांश अजूनही सापडला नाही; शोध सुरुच

दिव्यांश अजूनही सापडला नाही

गोरेगाव येथील एका उघड्या गटारात एक तीन वर्षीय चिमुकला पडला. या चिमुकल्याचे नाव दिव्यांश सिंग असे आहे. बुधवार रात्रीपासून त्याचा शोध सुरु आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्हीमध्ये तो गटारात पडताना स्पष्ट दिसत आहे. खेळता खेळता तो बुधवारी रात्री रस्त्यावर आला आणि एका उघड्या गटारात पडला. दरम्यान, पोलीस प्रशासन आणि अग्नीशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत. गटारापासून जवळ असलेल्या नाल्यामध्ये तो वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, अध्यापही त्याचा तपास लागलेला नाही. अग्नीशमनच्या जवानांनी आतापर्यंत दहा किमीपर्यंतच्या ड्रेनेज लाईनची पाहणी केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

दिव्यांश सिंग आपल्या आई-वडील आणि दोन भावंडांसह गोरेगाव-मुंबई लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकातील चाळीत राहत होता. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास तो आपल्या वडिलांच्या पाठोपाठ घरातून बाहेर निघाला. परंतु, ही गोष्ट त्याच्या वडिलांना माहित नाही, चाळीतून बाहेर निघाल्यावर तो वडिलांचा पाठलाग करत असताना उघड्या गटारात पडला. दरम्यान, दिव्यांशच्या आईने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. दिव्यांश मिळत नसल्याने त्याच्या आईने आरडोओरड केली. या आवाजात अजूबाजीचू लोक जमा झाली. त्यानंतर दिव्यांशचा शोध घेण्यासाठी परिसरातील मशिदीबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेट पाहण्यात आले. यावेळी दिव्यांश गटारात पडल्याचे आढळले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दल देखील घटानस्थली दाखल झाले. रात्रभर शोध मोहिम सुरु राहिली. मात्र, दिव्यांश सापडला नाही. गुरुवारी दिवसभर आणि रात्री देखील त्याचा शोध सुर आहे. मात्र, तो अध्यापही सापडलेला नाही.


हेही वाचा – मुंबईत नाल्यात वाहून गेला चिमुरडा!

First Published on: July 12, 2019 9:59 AM
Exit mobile version