मुंबईतील आयकॉनिक ब्रिजसाठी दुसऱ्यांदा निविदा  

मुंबईतील आयकॉनिक ब्रिजसाठी दुसऱ्यांदा निविदा  

केबल स्टेड ब्रिज म्हणजे वांद्रे वरळी सी लिंकच्या धर्तीवरच मुंबईत आणखी तीन आयकॉनिक ब्रिज निर्मितीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयारी सुरू केली आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यात मेट्रो २ ब कॉरिडॉरवर हे दोन ब्रिज आगामी कालावधीत उभारण्यात येणार आहेत. वाकोला, बीकेसी आणि मिठी नदी याठिकाणी तीन ब्रिजची निर्मिती केली जाणार आहे. एमएमआरडीने या ब्रिजच्या कामासाठी निविदा प्रक्रियेच्या कामाला सुरूवात केली आहे. एमएमआरडीएच्या अंदाजित खर्चापेक्षा जास्त बोलीची निविदा दाखल झाल्याने एमएमआरडीएने दुसऱ्या ही निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आकाश, तलवार आणि शून्य यापासून प्रेरणा घेऊन या आकाराच्या ब्रिजच्या निर्मिती या तीन ठिकाणी केली जाणार आहे.

मेट्रो २ ब प्रकल्पाअंतर्गत डी एन नगर ते मंडाले दरम्यानच्या टप्प्यात या ब्रिजची निर्मिती केली जाणार आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या तिन्ही आयकॉनिक ब्रिजची डिझाईन मंजुर करण्यात आली होती. हे तिन्ही ब्रिज केबल स्टेड ब्रिज म्हणून नावारूपाला येणार आहेत. बीकेसीमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये वाहतूकीच्या प्रकल्पांचा मोठा वाटा आहे. म्हणूनच या तीन ब्रिजच्या निर्मितीची सुरूवात करण्यात येणार आहे. या तिन्ही आयकॉनिक ब्रिजमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. वाकोला नाला येथून सुरू होणारा ८० मीटरचा ब्रिज हा कुर्ल्याच्या दिशेने उभारण्यात येईल. याची डिझाईन ही शून्याच्या आकाराप्रमाणे असेल. भारतीय गणित तज्ञ आर्यभट्ट यांच्या योगदानाला अभिवादन करणारी या ब्रिजची रचना असेल. तर कलानगर याठिकाणी उभारण्यात येणारा ब्रिज हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुळजाभवानीच्या तलवारीच्या प्रतिकृतीसारखा असेल. बीकेसीच्या प्रवेशाला सुरू होणारा ब्रिज हा ७३ मीटर लांबीचा असणार आहे. तर मिठी नदीच्या ब्रिजसाठी एमएमआरडीएने १२० मीटर लांबीचा आकाशाच्या आकाराचा ब्रिज तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्धवर्तुळाकार हा अशी आकाशाची डिझाईन असलेला हा ब्रिज आहे. या संपुर्ण ब्रिजच्या बांधकामासाठी एमएमआरडीएला १२० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. या भागात असणारा कांदळवनाचा भाग बाधित होऊ नये म्हणूनच केबल स्टेड ब्रिज बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

डिझाईनक्राफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने या तिन्ही डिझाईन तयार केल्या होत्या. या ब्रिजच्या निर्मितीसाठी दुसऱ्या निविदा प्रक्रिया राबवण्याची एमएमआरडीएवर वेळ आली आहे. याआधी एचसीसी आणि जे कुमारने किमान बोली लावणारी निविदा ही २३१ कोटी रूपयांची दाखल केली होती. पण एमएमआरडीच्या अंदाजित खर्चापेक्षा ही बोली २८ टक्के जास्त होती. म्हणूनच दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आला आहे. एमएमआरडीएने १८१ कोटी रूपये इतका अंदाजित खर्च म्हणून निविदा प्रक्रिया सुरू केली.

First Published on: June 18, 2020 8:34 PM
Exit mobile version