‘प्रमुख शहरे २४ तास सुरू ठेवण्यास मंजुरी द्यावी’

‘प्रमुख शहरे २४ तास सुरू ठेवण्यास मंजुरी द्यावी’

महिलांच्या हक्कासाठी नीलम गोऱ्हे आझाद मैदानावर

मुंबईसह नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, जळगाव, संभाजीनगर, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आदि शहरे २४ तास खुली ठेवण्याच्या प्रस्तावास गृह खात्याची मंजूरी मिळावी, यासाठी शिवसेनेच्या विधीमंडळ मुख्य प्रतोद आ. डॉ. नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यासारख्या अनेक शहरवासियांना नविन वर्षाच्या आगमनानिमित्त मनोरंजन व आनंदोत्सव साजरा करण्याची इच्छा असून याकरिता मनोरंजनाची सर्व ठिकाणे खासकरून अनिवासी भागात रात्रभर खुली ठेवावी अशी विनंती केलेली आहे.

मुंबई व इतर शहरे २४ तास खुली रहावी याकरिता मुंबई मनपाच्या २०१३च्या पारित प्रस्तावाला २०१५मध्ये मुंबई पोलिस आयुक्त यांनी संमती दिल्यानंतर सन २०१७मध्ये तो विधानसभेतही मंजूर झाला. सदरील परिपूर्ण प्रस्ताव गृह खात्याकडे काही महिन्यांपासून आपल्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. या निर्णयाने सर्व सुरक्षित आणि नियमित जागांवरून आपल्या राज्याच्या उत्पादनात वाढ होऊन अनेक रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. शिवाय, लाखो भूमिपुत्रांना नोक-या मिळतील. मुंबई व इतर शहरातील मॉल्स व मिल कंपाउंड येथील नियमित जागा २४ तास खुल्या केल्यास सध्याच्या तणावपूर्ण व व्यस्त कामकाज जीवनातून तरुणांना विश्रांती घेण्यास सोईस्कर होईल. तरी या संदर्भात आपण व्यक्तीशः लक्ष घालून निर्णय घेऊन मुंबईसह नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, जळगाव, संभाजीनगर, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर आदि शहरं २४ तास खुली ठेवण्याच्या प्रस्तावास गृह खात्याची मंजूरी देण्यात यावी, अशी विनंती डॉ. गो-हे यांनी केली आहे.

First Published on: December 27, 2018 10:30 PM
Exit mobile version